Corona Update: राज्यात दिवसभरात 57 हजार कोरोनामुक्त

 Corona Updates
Corona Updates

मुंबई- महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या 24 तासांत 57 हजार 640 नव्या कोरोनाबाधित (COVID19) रुग्णांची नोंद झाली आहे, तर 57 हजार 006 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज (discharges) देण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 920 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याने आतापर्यंत एकूण 72 हजार 662 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. राज्यात सध्या कोरोनाचे 6 लाख 41 हजार 596 सक्रिय रुग्ण (active cases) आहेत. राज्यात आतापर्यंत 48 लाख 80 हजार 542 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 41 लाख 64 हजार 098 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. (Maharashtra reports positive active cases Death toll discharges rajesh tope)

मुंबई मनपा 77 येथे सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली असून, पुणे मनपा 59, नाशिक मनपा 52, नाशिक 49 सोलापूर 46, नागपूर मनपा 42 मृत्यू नोंदवण्यात आले. मृत्यूचा दर 1.49 % इतका आहे.आज दिवसभरात 57,640 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 48,80,542 झाली आहे. आज नोंद झालेल्या 920 मृत्यूंपैकी 414 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 219 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.तर 287 मृत्यू हे आठवड्यापेक्षा अधिक कालावधी पूर्वीचे आहेत. राज्यात आज रोजी एकूण 6,41,596 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,83,48,582 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 48,80,542 (17.19 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 38,52,501 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 32,174 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 Corona Updates
राज्यातील १५०० माजी आमदारांचे एक महिन्याचे वेतन कोरोना रुग्णांसाठी

दिवसभरात 57,006  रुग्ण कोरोनामुक्त

आज 57,006 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण 41,64,098 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.32 % एवढे झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com