तुम्हीच ओळखा धोका; पहा ग्राफिक्स

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 5 July 2020

राज्यात अवघ्या तीन दिवसांमध्ये कोरोना संसर्गाचे १८ हजार नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोना उद्रेकाचा धोका अजूनही कायम आहे. ‘अनलॉक’ याचा अर्थ आता सगळं ‘नॉर्मल’ झालंय असा नाही. तर, ‘न्यू नॉर्मल’ असा आहे. यामुळे दिवसभरात प्रत्येक कृती करताना त्यात संसर्गाचा किती धोका आहे, याची शास्त्रीय माहिती प्रत्येकाकडे असलीच पाहिजे.

राज्यात अवघ्या तीन दिवसांमध्ये कोरोना संसर्गाचे १८ हजार नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोना उद्रेकाचा धोका अजूनही कायम आहे. ‘अनलॉक’ याचा अर्थ आता सगळं ‘नॉर्मल’ झालंय असा नाही. तर, ‘न्यू नॉर्मल’ असा आहे. यामुळे दिवसभरात प्रत्येक कृती करताना त्यात संसर्गाचा किती धोका आहे, याची शास्त्रीय माहिती प्रत्येकाकडे असलीच पाहिजे. सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री पुन्हा झोपेपर्यंत आपण जे-जे करतो त्या प्रत्येकात धोक्‍याची पातळी नेमकी किती, याची वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने मांडलेली माहिती...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Image may contain: stripes

हे करा

  • घराबाहेर पडताना मास्क वापरा
  • वारंवार साबणाने २० सेकंद हात स्वच्छ धुवा
  • सॅनिटाझरचा नियमित वापर करा
  • हातमोजे वापरा
  • फळे, ताज्या पालेभाज्या आहार घ्या

हे करू नका

  • गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा
  • कामाशिवाय घराबाहेर पडू नका
  • अशास्त्रीय माहितीवर विश्वास ठेवू नका
  • मित्र-मैत्रिणींना, नातेवाइकांना घरात बोलावून गप्पांचे फड रंगवू नका 
  • शिळे, उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळा.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एकमेकांत सुरक्षित अंतर ठेवणे, गर्दीची ठिकाणे टाळणे हे मुख्य प्रतिबंधात्मक उपाय पाळणे जिथे शक्‍य होत नाही अशा व्यवहारांनी कोरोनाची बाधा होण्याची शक्‍यता जास्त असते. व्यायामावेळी मास्क बांधणे त्रासाचे असते, पण त्यातून आजार पसरू शकतो. त्यामुळे नागरिकांनी किमान धोका असलेली कामे करावीत.
- डॉ. अविनाश भोंडवे, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Virus Patients Increase in Maharashtra