Corona Updates : राज्यात कोरोनाचे वेगाने पुनरागमन; २४ तासांत रग्णसंखेत १८६ टक्क्यांनी वाढ, ४ मृत्यू | Maharashtra Corona Updates | Corona Patients In Maharashtra | coronavirus in Maharashtra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus in maharashtra latest cocona updates new covid cases up by 186 per cent in Maharashtra 4 deaths

Corona Updates : राज्यात कोरोनाचे वेगाने पुनरागमन; २४ तासांत रग्णसंखेत १८६ टक्क्यांनी वाढ, ४ मृत्यू

Maharashtra Corona Updates : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसून येते आहे. आज (४ एप्रिल) राज्यात ४ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज राज्यात ७११ नवीन रुग्णांची भर पडली आहे. राज्यात मागील २४ तासांत झालेली ही वाढ १८६ टक्के इतकी आहे.

मंगळवारी संपूर्ण राज्यभरात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या राज्यातील मृत्युदर हा एक १.८२% इतका आहे. आज मृत पावलेल्या रुग्णांची संख्या पिंपरी चिंचवड मनपा - १, सातारा - २ आणि रत्नागिरी - १ अशी आहे.

एक दिवस आधी राज्यात २४८ रुग्णांची नोंद झाली होती. राज्यात मागील सात दिवसात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्याचा मृत्यूदर हा १.८२ टक्के इतका आहे.

आज दिवसभरात तब्बल ४४७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच आजपर्यंत राज्यात एकूण ७९,९४,०६० करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचेप्रमाण ९८.१३ टक्के इतका आहे.

राज्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असताना कोणताही मोठा धोका नसल्याचं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलं आहे. आरोग्य यंत्रणा सज्ज असून मी दर २४ तासात याबाबत आढावा घेत असून आरोग्य विभागाला योग्य त्या सूचना देत असल्याचं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे.