Coronavirus : दिल्लीतील मरकजच्या कार्यक्रमावर शरद पवारांची प्रतिक्रीया; म्हणाले...

Coronavirus Sharad Pawar Speaks About Markaz Program Delhi
Coronavirus Sharad Pawar Speaks About Markaz Program Delhi

मुंबई : दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मरकजच्या कार्यक्रमावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मौन सोडलं. शरद पवार यांनी म्हटले आहे की, दिल्लीतील निझामुद्दीन येथे आयोजित करण्यात आलेल्या मरकजच्या कार्यक्रमाचा देशभरात परिणाम झाला आहे. मरकजचा हा कार्यक्रम टाळता आला असता. महाराष्ट्रात असं घडू देऊ नये, असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शरद पवार यांनी आज (गुरूवार) पुन्हा एकदा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. दिल्लीत मरकजच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्या ठिकाणी हजारो लोक जमले होते. राज्यातलेही अनेकजण त्या ठिकाणी गेले होते. कार्यक्रमानंतर त्यातील काही लोक इतरत्र गेले. त्यातील काही लोकांना करोनाचा प्रादुर्भाव होऊन त्यांनी एकत्र प्रवास केल्याचं नाकारता येत नाही. आता करोनाचा आजार वाढत आहे.

Coronavirus : पद्मश्री पुरस्काराने सन्मानित असलेल्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू

आजची स्थिती पाहता आपण काही गोष्टी पाळल्या पाहिजेत. असे प्रकार पुन्हा घडता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे. मरकजचा सोहळा टाळला पाहिजे होता, असं शरद पवार यावेळी म्हणाले. दरम्यान मुस्लिम लोकांनी घरातूनच नमाज अदा करावी, अशी सूचनाही त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केली आहे.

Coronavirus : महायुद्धानंतर पहिल्यांदाच विम्बल्डन स्पर्धा रद्द

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या ३३७ वर पोहचली आहे. राज्यात दिवसेंदिवस परिस्थिती चिंताजनक बनत असून काल (ता. ०१) राज्यात दिवसभरात कोरोना व्हायरसचे ३३ नवे रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाने या संदर्भात माहिती जाहीर केली आहे. मुंबईतच १४ नवीन रुग्ण तर बुलढाण्यात १ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने ३२० वरुन रुग्णांची संख्या थेट ३३७ वर गेली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे. आशियातील सर्वात मोठ्या धारावी झोपडपट्टीत कोरोनाचा एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. हा रुग्ण 56 वर्षांचा असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हा रुग्ण धारावीतील शाहू नगर येथे आढळून आला. त्याच्याघरातील ०८ ते १० जणांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. याशिवाय हा रुग्ण राहत असलेल्या इमारतीला सील करण्यात येत आहे. त्यासोबतच दिवसभरात राज्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com