तिसऱ्या लाटेसाठी खबरदारी, 6000 टन ऑक्सिजनची तयारी

 ऑक्सिजन
ऑक्सिजनसंग्रहित छायाचित्र

मुंबई : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आलीच, तर ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) हालचाली सुरू केल्या आहेत. त्याअनुषंगाने राज्यभरात ६ हजार टन ऑक्सिजनच्या निर्मितीची तयारी करण्यात येत असल्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त परिमल सिंग यांनी सांगितले.

कोरोनाची तिसरी लाट आल्यास रुग्णसंख्या व त्यासाठी ऑक्सिजनची मागणीही वाढण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात १७०० ते १८०० टन ऑक्सिजनची मागणी आहे. तिसऱ्या लाटेसाठी बाराशे टन ऑक्सिजनचे मोठे प्रकल्प तयार करण्यात येत असून त्या माध्यमातून राज्यात ६ हजार टन ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती परिमल सिंग यांनी दिली. राज्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिसने एक हजार ३५८ रुग्ण दगावले; तर एक हजार चार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

गेल्या महिनाभरात मुंबईतदेखील दहा रुग्णांची भर पडली. म्युकरमायकोसिस नियंत्रणात असला, तरी त्यासाठी आवश्यक औषधांचा साठा करण्याचे निर्देश दिले आहेत. हाफकिन संस्थेच्या माध्यमातून ही खरेदी करण्यात येत असल्याची माहितीही परिमल सिंग यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com