अकोल्याचे नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 21 डिसेंबर 2016

मुंबई - अकोल्यातील दहा नगरसेवकांनी मंगळवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा पक्षप्रवेश झाल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मुंबई - अकोल्यातील दहा नगरसेवकांनी मंगळवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा पक्षप्रवेश झाल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रवक्‍ते नवाब मलिक आणि शिवसेनेतून "राष्ट्रवादी'त नुकताच प्रवेश केलेले गुलाबराव गावंडे, अकोला जिल्हाध्यक्ष विजय देशमुख या वेळी उपस्थित होते. अकोला महापालिकेची निवडणूक येत्या फेब्रुवारीत होत आहे. ""विदर्भाच्या प्रवेशद्वारावरील जिल्ह्यातून "राष्ट्रवादी'त मोठ्या प्रमाणात नेते आणि कार्यकर्ते प्रवेश करीत असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस विदर्भात मजबूत होईल. अकोला महापालिका निवडणुकीत शहराला धर्मनिरपेक्ष आणि विकासोन्मुख राजकारण काय असते ते दाखवून देऊ,'' असा विश्‍वास तटकरे यांनी या वेळी व्यक्‍त केला.

प्रवेश केलेल्या नगरसेवकांत भारिपच्या माजी महापौर ज्योत्स्ना गवई, माजी उपमहापौर रफीक सिद्धिकी, कॉंग्रेसचे नगरसेवक दिलीप देशमुख, नगरसेविका कोकिळा दाबेराव, जया गेडाम, निहकत शाहीन अफसर अहमद कुरेशी, रिजवाना शेख अजीज, समाजवादी पक्षाचे नकीर खान, "युडीएफ'च्या रहीमॉंबी अब्दुल्ला खान व अपक्ष नगरसेविका हाजीराबी अब्दुल रशीद यांचा समावेश होता.

Web Title: corporator entry in ncp