संस्थांच्या नावात भ्रष्टाचार, मानवाधिकार नको 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

मुंबई - भ्रष्टाचार निर्मूलन संघटना, मानवाधिकार संघ आदी नावाने असलेल्या संस्थांना राज्याच्या धर्मादाय आयुक्तांनी दणका दिला आहे. अशा संस्थांनी आपल्या नावातील भ्रष्टाचार, मानवाधिकार हे शब्द काढून टाकावेत; अन्यथा त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त शिवकुमार डिगे यांनी दिला आहे. 

राज्य मानवाधिकार आयोगाच्या हंगामी अध्यक्षांनी या कारवाईची सूचना केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर डिगे यांनी गुरुवारी एका पत्रकाद्वारे हा आदेश दिला आहे. भ्रष्टाचारमुक्त भारत, भ्रष्टाचारविरोधी आंदोलन अशा संस्थांच्या नावांमुळे नागरिकांची फसवणूक होऊ शकते, असेही पत्रकात म्हटले आहे. भ्रष्टाचार निर्मूलन आणि मानवाधिकारांची जपणूक ही केवळ सरकारची कामे आहेत; ही कामे खासगी संस्थांची नाहीत. त्यामुळे त्या संस्थांच्या घटनेत वरील उद्दिष्टे असूच शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी आपल्या संस्थांची नावेही या शब्दांपासून तयार करू नयेत, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. 

गैरसमज दूर 
अशा प्रकारच्या नावांमुळे भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे अधिकार या संस्थांना आहेत, असा नागरिकांचा समज होऊ शकतो. मानवाधिकारांचे उल्लंघन झाल्यास त्याबाबत मानवाधिकार आयोग कारवाई करते; मात्र मानवाधिकार नावाच्या संघटनांमुळेही लोकांचा गैरसमज होऊ शकतो, असे आयुक्तांनी म्हटले आहे. 

Web Title: Corruption does not have human rights in the names of organizations