राज्यातील कापूस गुजरातेत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

अमरावती - राज्यातील नव्वद टक्के जिनिंग बंद आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना भाव अधिक असला; तरी स्थानिक पातळीवर लाभ नाही. कापसाला भाव अधिक असला तरी तो गुजरातमध्ये चोरट्या मार्गाने निर्यात होत आहे. कापसाचा हा व्यवहार हवाला पद्धतीने होत असून त्यामध्ये वस्तू व सेवा करासहित अन्य कर वाचत असल्याने गुजरातमधील व्यापाऱ्यांनी  विदर्भासह मराठवाडा व खानदेशात कापसाची चढ्या दराने खरेदी सुरू केली आहे.

राज्यातील ९०० पैकी दहा टक्केच जिनिंग मिल सुरू आहेत. याचा लाभ गुजरातमधील व्यापाऱ्यांनी घेतला आहे. मिल मालकाच्या साहाय्याने महाराष्ट्रात कापसाची खरेदी सुरू केली आहे. 

गुजरातमध्ये आखूड धाग्याचा कापूस तयार होतो. या कापसात लांब धाग्याचा कापूस मिसळून भेसळ करावी लागते. त्यामुळे त्यांनी चढ्या दराने खरेदी सुरू केली आहे. गुजरातमध्ये कापसाची चोरटी निर्यात सध्या सुरू आहे. वस्तू व सेवा करासह अन्य कर चुकविल्याने त्यांना फायदा होतो.

कापूस मिळवण्यासाठी राज्यात गुजरामधील व्यापारी दाखल झाले आहेत. त्यांनी विदर्भ, मराठवाडा या परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसोबत करार करण्यास सुरुवात केली आहे. कमी दरात कापूस विकायला शेतकरी तयार नसल्याने मिल मालकांनीकरार पद्धत अवलंबली आहे. शेतकऱ्यांना एक ते तीन महिन्यांपर्यंत जे दर असतील त्यानुसार पैसे देण्याचे करारात नमूद आहे. तीन महिन्यांत दर कमी झाले तरी कराराप्रमाणे पैसे देण्याचे कबूल करण्यात येते.

शेतकऱ्यांची फसवणूक 
वस्तू व सेवाकर लागू झाल्यानंतर कापसाचे पैसे बॅंकांच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने किंवा धनादेशाद्वारे देण्यास प्रारंभ झाला होता. गतवर्षी त्याचे पालन झाले. मात्र, आता रोखीने व्यवहार सुरू झाले आहेत. गुजरातला जाणाऱ्या कापसाचे व्यवहार हवाला पद्धतीने होत आहेत. या पद्धतीत करचुकवेगिरी तर होतेच, मात्र अनेकदा शेतकऱ्यांची फसवणूकदेखील होते.

Web Title: Cotton give to gujrat