'ते' प्रेमदिवाने दाम्पत्य सापडले; त्यांच्याशी खास बातचीत (Video)

प्रा. भगवान जगदाळे
Monday, 18 November 2019

आदिवासी दाम्पत्याची धम्माल 
जामदेपासून जवळच शेतात झोपडीवजा घरात राहणाऱ्या दिनेश शंकीलाल पवार (वय 31) व लखाणी दिनेश पवार (वय 25) या दाम्पत्याची ही धडपड वाखाणण्याजोगी आहे. दिनेशचे प्राथमिक शिक्षण झाले आहे. तर लखाणी अशिक्षित आहे. शेती व्यवसाय करणाऱ्या या पवार दाम्पत्याला रश्‍मी (वय 13) व शिवम (वय 11) अशी दोन अपत्ये असून ते दोन्हीही नवापाडा येथील निवासी आदिवासी आश्रमशाळेत शिक्षण घेत आहेत. 

निजामपूर : शेतामध्ये "मैने प्यार किया' या चित्रपटातील "दिल दिवाना...' या गाण्यावर नृत्य करणाऱ्या जोडप्याने सोशल मिडीयावर धम्माल उडविल्यानंतर लगेच "हम तेरी मोहब्बत मे यु पागल रहते है...' या गीतावरील नृत्याचा व्हिडीओ आला. या दोन्ही व्हिडीओवर लाखो नेटीझन्सच्या प्रतिक्रीया उमटल्या. सोशल मिडीयावर धम्माल उडविणारे हे जोडपे नेमके कोण आणि कुठले याची साऱ्यांनाच उत्सुकता होती. मग जाणून घ्या.. हे जोडपे नेमके कोण आणि कुठले. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

माळमाथा परिसरातील जामदे (ता.साक्री) येथील एका फासेपारधी समाजाचे आदिवासी जोडपे. या जोडप्याने "विगो' व्हिडिओंनी सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला असून आतापर्यंत बॉलीवूड अभिनेत्री रविना टंडनसह लाखो नेटिझन्सनी त्यांच्या व्हिडिओवर प्रतिक्रीया नोंदवून अक्षरशः डोक्‍यावर घेतले. मात्र ते कलाकार कोण आहेत? कुठले आहेत? ते नक्की जोडपेच आहे का? कोणत्या जागी हे व्हिडिओ बनविण्यात आले? याबाबत त्यांच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. त्यासंदर्भात ई-सकाळने 'कृपा करून त्यांना हसू नका' या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित केले होते. शेवटी 'सकाळ'नेच सर्वप्रथम या प्रश्नांची उत्तरे शोधून काढली! 

पर्याय सर्वपक्षीय संयुक्त सरकारचा 

आदिवासी दाम्पत्याची धम्माल 
जामदेपासून जवळच शेतात झोपडीवजा घरात राहणाऱ्या दिनेश शंकीलाल पवार (वय 31) व लखाणी दिनेश पवार (वय 25) या दाम्पत्याची ही धडपड वाखाणण्याजोगी आहे. दिनेशचे प्राथमिक शिक्षण झाले आहे. तर लखाणी अशिक्षित आहे. शेती व्यवसाय करणाऱ्या या पवार दाम्पत्याला रश्‍मी (वय 13) व शिवम (वय 11) अशी दोन अपत्ये असून ते दोन्हीही नवापाडा येथील निवासी आदिवासी आश्रमशाळेत शिक्षण घेत आहेत. 

Image may contain: 2 people, outdoor and nature

शिवसेना संसदेत विरोधी बाकांवर

आणखी काही गाण्यांचेही शुटींग 
लहानपणापासूनच दोघांनाही नृत्य व अभिनयाची आवड असल्याने ती आवड त्यांना स्वस्थ बसू देत नसल्याने गावातीलच जानिश सुरेश चव्हाण यांच्या सहकार्याने त्यांनी त्यांच्या शेतासह आजूबाजूच्या परिसरात आतापर्यंत त्यांनी अर्धा ते एका मिनिटांचे सुमारे शंभरावर 'व्हिगो' व्हिडिओ बनवले. निजामपूर- जैताणेपासून जवळच्या भामेर शिवारातील म्हसाई मंदिर परिसरातही त्यांनी काही गाण्यांचे शूटिंग केले आहे. 

Image may contain: 2 people

रविना टंडनलाही भावले 
त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याबरोबर असंख्य नेटिझन्सच्या अनोख्या प्रतिक्रिया उमटल्या. एवढेच नाही तर भय्याजी नावाच्या ट्‌विटर युझरसह रविना टंडननेही 'मैने प्यार किया' चित्रपटातील 'दिल दिवाना' हे एका मिनिटांचे गीत शेअर केले. आतापर्यंत हे गाणे लाखो नेटिझन्सनी पाहिले. हजारोंच्या संख्येने लाईक्‍स व कंमेंट्‌स मिळाल्या असून शेकडो चाहत्यांनी ते शेअरही केले आहे. रविना टंडन यांनी या व्हिडिओची दखल घेत हा 'आतापर्यंतचा सर्वात क्‍युट व्हिडिओ' असल्याची प्रतिक्रिया ट्‌विटरवरून व्यक्त केली आहे. जामदेचे पोलिस पाटील किरण पवार यांच्यासह तेथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: couple dance social media viral