आमदार रमेश कदम यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश

ramesh kadam
ramesh kadam

मुंबई : अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित आमदार रमेश कदम यांची 135 कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाने आज (शुक्रवार) दिला आहे.

सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हे अन्वेषण विभाग रमेश कदम यांची एकूण 135 कोटी 16 लाख 82 हजार 608 रुपयांची मालमत्ता जप्त करणार आहे. यात शेती, प्लॉट, कपेडर रोड येथील प्लॉट, औरंगाबादमधील मालमत्ता, बँक खाती अशा एकूण 54 मालमत्ता जप्त करण्याचे आदेश न्यायमूर्ती टंकीवाला यांनी दिले आहेत.

अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळाप्रकरणी आमदार रमेश कदम सध्या अटकेत असून, त्यांनी 400 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा घोटाळा केल्याचे म्हटले जात आहे. पुणे-नगर रस्त्यावरील ग्रँण्ड ह्यात या पंचतारांकित हॉटेलमधून सीआयडीच्या पथकाने त्यांना अटक केली.

अण्णाभाऊ साठे महामंडळात 250 कोटींचा गैरव्यवहार झाला असून, त्याचे 3700 पानी पुरावे आपण लाचलुचपतसह सर्व विभागांना दिले आहेत, असा दावा माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केला. या घोटाळ्याबाबत महामंडळाचे माजी अध्यक्ष आमदार रमेश कदम यांच्यावर ढोबळेंनी थेट आरोप केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com