छगन भुजबळ यांना न्यायालयाचा दिलासा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

मुंबई - महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यासह सर्व आरोपींना पीएमएलए न्यायालयाने दिलासा दिला आहे. या सर्वांना 6 ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे आदेश देत न्यायालयाने निकाल राखून ठेवला. या सर्वांना वैयक्तिक हमीपत्र देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. 

दरम्यान, एखाद्या प्रकरणात जामीन मिळाला असताना पुन्हा त्यात अटक कशी होऊ शकते, असा दावा आरोपींच्या वतीने न्यायालयात करण्यात आला. सक्तवसुली संचालनालयाने काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये आणखी एक गुन्हा दाखल केल्यामुळे भुजबळ, त्यांचे पुत्र पंकज आणि पुतणे समीर यांच्यासह 25 जण विशेष न्यायालयात बुधवारी हजर झाले. न्यायालयाने नवा गुन्हा दाखल करून घेतला नसून हा पूर्वीच्याच प्रकरणाचा एक भाग असल्याचे संचालनालयाच्या तक्रारीवरून दिसत आहे. महाराष्ट्र सदन व इंडिया बुल्स प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयानेही काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणी भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर यांना अटक झाली होती. या गैरव्यवहारात भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी 860 कोटी कमवल्याचा आरोप आहे. सुरुवातीला त्यापैकी 291 कोटींची मालमत्ता संचालनालयाने ताब्यात घेतल्यानंतर आणखी 25 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली होती. या प्रकरणात भुजबळ आणि संबंधितांविरोधात काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Court relief to Chhagan Bhujbal