मराठवाड्यात 1214 कोटींचा पीकविमा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 जून 2018

मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, नांदेड व परभणी या पाच जिल्ह्यांतील 25 लाख 14 हजार शेतकऱ्यांना 1214 कोटी 57 लाख रुपयांचा पीकविमा परतावा मंजूर झाला आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, नांदेड व परभणी या पाच जिल्ह्यांतील 25 लाख 14 हजार शेतकऱ्यांना 1214 कोटी 57 लाख रुपयांचा पीकविमा परतावा मंजूर झाला आहे. 2017-18 च्या खरीप हंगामासाठी मंजूर असलेल्या या प्रधानमंत्री पीक योजना योजनेत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील 63 लाख 99 हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. 

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत खातेदार शेतकऱ्यांची संख्या 34 लाख 82 हजार एवढी आहे. 2017-18 च्या खरीप हंगामात मराठवाड्यातील 63 लाख 99 हजार शेतकरी प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागी झाले होते. या शेतकऱ्यांनी आठही जिल्ह्यांतील एकूण खरीप क्षेत्रापैकी 30 लाख 46 हजार हेक्‍टर क्षेत्र विमा उतरवून संरक्षित केले होते. यामध्ये औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, नांदेड व परभणी या पाच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना पीकविमा परताव्यापोटी 1214 कोटी 57 लाख रुपये मंजूर झाले आहेत. 

Web Title: Crop insurance of 1214 crores in Marathwada