पीकविमा योजनेला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 25 जुलै 2018

मुंबई - खरीप हंगाम- 2018 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत असून, या योजनेसाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव सादर करण्यास 31 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रत्येक जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकारी यांच्याशी संवाद साधून कृषी विभागाचा आढावा घेतला. कृषिमंत्री चंद्रकांत पाटील हे सांगलीहून, तर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत कोल्हापूर येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते. या आढावा बैठकीस कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, कृषी आयुक्त आदी उपस्थित होते. 

बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व संबंधित विभाग, घटक आणि प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण, कृषी विद्यापीठ यांची वेळोवेळी मदत घेऊन शेतकऱ्यांचे याबाबत प्रबोधन करून पिकांचे नुकसान होणार नाही, यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे आवश्‍यक आहे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. 

Web Title: Crop insurance scheme extended till July 31