सुरू असलेले प्रकल्प बंद करणार नाही - जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

कोणालाही पाठीशी घालणार नाही
‘कोरेगाव-भीमाच्या प्रकरणात संभाजी भिडेंना सहानुभूती दाखविण्याचा कोणताही प्रयत्न नाही. ज्यांनी जाणीवपूर्वक गुन्हा केला आहे अशांना सहानुभूती दाखवणार नाही,’’ असे जयंत पाटील यांनी सांगितले. ‘‘या संदर्भातील सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत. तथापि, कोणत्या गुन्ह्यांत कार्यकर्त्यांना गुंतवले गेले आहे, याची माहिती घेऊ. दंगल घडवण्याचा हेतू नसणाऱ्यांचे गुन्हे मागे घेतले जातील.’’ असेही पाटील म्हणाले.

मुंबई - ‘आम्हाला महाराष्ट्राची आणि महाराष्ट्र सरकारच्या आर्थिक स्थितीची काळजी आहे. राज्यात जे प्रकल्प सुरू आहेत ते बंद करणार नाही. परंतु, काही प्रकल्पांची माहिती घेतली जाईल आणि नंतर निर्णय घेण्यात येईल,’’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारमधील मंत्री जयंत पाटील यांनी आज केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आर्थिक श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कालच्या बैठकीत सरकारने विकास प्रकल्पांचा आढावाही घेतला. या पार्श्वभूमीवर आज बोलताना पाटील यांनी महाराष्ट्राची तिजोरी कुणी कशी खाली केली याची माहिती जनतेला देणार असल्याचे सांगितले.

अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रावादीचा मोठा निर्णय; समिती स्थापन

‘आधीच्या सरकारने राज्यातील काही प्रकल्पात पैसे गुंतवले आहेत. त्यामुळे हे प्रकल्प पूर्ण करावेच लागतील; परंतु आघाडीचे सरकार त्या प्रकल्पांची कार्यक्षमता कशी वाढवता येईल आणि खर्च कसा कमी करता येईल, यावर भर देईल,’’ असे त्यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The current project will not close jayant patil