काही मिनिटात निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्रात; किनारपट्टीभागात मुसळधार पावसाला सुरवात

cyclone nisarga update Maharashtra heavy rain in kokan raigad
cyclone nisarga update Maharashtra heavy rain in kokan raigad

मुंबई- कोरोना विषाणूने थैमान घातले असतानाच आता महाराष्ट्रावर निसर्ग चक्रीवादळाचे संकट घोंघावत आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर चक्रीवादळात झाले आहे. निसर्ग चक्रीवादळाने रौद्र रुप धारण केले असून किनारपट्टी भागात पावसाला सुरुवात झाली आहे. रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीतील भागात या चक्रीवादळाचा प्रभाव दिसू लागला आहे. किनारपट्टी भागात सोसाट्याचा वारा सूटला असून अनेक झाडं उन्मळून पडली आहेत. श्रीवर्धन, मुरुड आणि अलिबाग या तालुक्यात तुफान पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच तेथील विजपुरवठा खंडित झाला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पुढच्या काही मिनिटात निसर्ग चक्रीवादळ महाराष्टात धडकणार आहे. किनारपट्टी भागात वाऱ्याची गती वाढली आहे. वारा 100 ते 110 किमी प्रति तास या वेगाने पुढे सरकत आहे. तसेच समुद्राला उधाण आलं आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून 40 हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. तसेच किनारपट्टी भागात एनडीआरएफच्या तुकड्या मदतीसाठी तैनात करण्यात आल्या आहेत. चक्रीवादळ किनारपट्टीवरील भागांना जास्त हानी पोहोचवण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई, पालघर, सिंधुदूर्ग, रायगड, ठाणे, रत्नागिरी जिल्ह्यात किनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना घरातच सुरक्षित स्थळी थांबण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहे. 
---------
भारत-बांगलादेश सीमावर्ती भागात भूकंपाचे धक्के
---------
तिबेटमध्ये चीनचा युद्धसराव; पडद्यामागे चीन चाललंय काय?
---------
वादळाचा प्रभाव श्रीवर्धन, मुरुड आणि अलीबाग या तालुक्यात जास्त प्रमाणात आहे. तालुक्यांमध्ये धुवाधार पावसाला सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील जवळपास 13,000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवण्यात आले आहे. तसेच एनडीआरएफच्या तुकड्या मदतीसाठी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. दुपारी चारपर्यंत वादळाचा प्रभाव कायम राहणार असल्याची शक्यता असल्याने नागरिकांनी घरातच राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच जिह्यात पुढील 24 तासांसाठी संचारबंदी लागू केली आहे. मुंबईतील वेगवेगळ्या भागात एनडीआरएफच्या 8 आणि नौदलाच्या 5 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com