Maha Cyclone : सावधान! महा चक्रीवादळामुळे राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

कोणत्याही मदतीसाठी मंत्रालय नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आल्याचे मंत्रालय नियंत्रण कक्षाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

मुंबई : गेल्या आठवड्यात आलेल्या क्यार या चक्रीवादळानंतर आता महा या चक्रीवादळाने आपला मोर्चा कोकण किनारपट्टीकडे वळवला आहे. क्यार या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीला जोरदार तडाखा दिला होता. देवबाग, वेंगुर्ला, मालवण या भागातील अनेक ठिकाणांचे नुकसान झाले. त्यानंतर आता महा चक्रीवादळाचे संकट राज्याच्या सीमेवर आले आहे.

Image may contain: cloud, outdoor, water and nature

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या महा चक्रीवादळामुळे 6 ते 8 नोव्हेंबर 2019 पर्यंत उत्तर कोकणासह उत्तर मध्य महाराष्ट्राला मेघगर्जनेसह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच समुद्रामध्ये वाऱ्याचा वेग जास्त राहणार असल्याने मच्छिमारांना देखील समुद्रात न जाण्याबाबत भारतीय हवामान खात्याने आवाहन केले आहे.

Image may contain: water, outdoor and nature

समुद्रात गेलेल्या मच्छिमारांना पुन्हा समुद्र किनारपट्टीवर येण्याचे देखील या सूचनेत कळविण्यात आले आहे. याबाबत योग्य त्या उपाययोजनेसह तयारीत राहण्याबाबत सर्व विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही मदतीसाठी मंत्रालय नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आल्याचे मंत्रालय नियंत्रण कक्षाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- फडणवीसांमुळेच युतीत तणाव वाढला; भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाची नाराजी

- शरद पवारांसोबत मुख्यमंत्रीही उद्या दिल्ली दरबारी; सत्तेचा तिढा सुटणार?

- खड्ड्यांच्या तक्रारींचा पाऊस! सहायक आयुक्तांचा खिसा रिकामा होणार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cyclonic storm Maha to make landfall in Kokan and central Maharashtra