
Sharad Pawar : भाजपला लोकसभेत पराभूत करण्याचा प्लॅन ठरला! शरद पवार अन् डी राजांनी आखली योजना
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत. भाजपचा दारुण पराभव झाला आहे. राज्याची सत्ता आता काँग्रेसच्या हातात गेली आहे. काँग्रेसने निवडणुकीत १३५ जागा जिंकल्या. २०१८ मध्ये काँग्रेसला ८० जागा मिळाल्या होत्या. तर भाजपच्या १०४ वरुन ६६ जागा झाल्या आहेत.
जेडीएसलाही १८ जागांवर नुकसान झाले आहे. जेडीएसचे केवळ १९ उमेदवार निवडणूक जिंकू शकतील. चार जागा इतरांच्या खात्यात गेल्या. या निकालांवरुन लोकसभा निवडणुकांचे अंदाज बांधल्या जात आहेत.
आज कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी राजा यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राजा म्हणाले, मी पक्षाच्या कामसाठी मुंबईत आलो. त्यानंतर मी शरद पवार यांना भेटण्यासाठी आलो. शरद पवार यांना काही योजना सांगतिल्या. राष्ट्रीय मुद्द्यांवर आम्ही नेहमी चर्चा करत आलो. आता आमचा मुख्य मुद्दा आहे की भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी एकत्र यायला हवे.
कर्नाटकने भाजपला हारवू शकतो, हे दाखवून दिले. फक्त या विधानसभेत नाहीत तर २०२४च्या लोकसभेलाही भाजपला पराभूत करता येऊ शकतं. त्यासाठी आम्ही तयारी करत आहोत. राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची मोट बांधण्यासाठी ही भेट होती, असे डी राजा यांनी स्पष्ट केले.
डी राजा म्हणाले, आम्ही राजकारणावर चर्चा केली. राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची मोट बांधण्यासाठी ही भेट होती. कर्नाटकने भाजपला हारवू शकतो, हे दाखवून दिल्याचे डि राजा म्हणाले.
कर्नाटकने एक संदेश दिला आहे. विरोधकांना कर्नाटकने रस्ता दाखवला आहे. आता मेहनत करण्याची शक्यता आहे. भाजपविरोधात शक्ती दाखवावी लागले. लहान पक्षांची मोर्चेबांधनी करुन जनतेला नवा पर्याय देण्याचा विश्वास द्यावा लागेल, असे शरद पवार म्हणाले.