आमदार बच्चू कडूंची मंत्रालयात अशीही दबंगगिरी! 

आमदार बच्चू कडूंची मंत्रालयात अशीही दबंगगिरी! 

मुंबई - महापरीक्षा पोर्टलच्या भोंगळ कारभाराविषयी जाब विचारण्यासाठी गेलेल्या आमदार कडू यांना अधिकाऱ्याने मुजोरीने उडवाउडवीची उत्तरे दिली. या वेळी संतप्त झालेल्या आमदार बच्चू कडू यांनी माहिती तंत्रज्ञान संचालक प्रसाद पी यांच्या दिशेने लॅपटॉप भिरकावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या कार्यकर्त्याने वेळीच अडवल्याने मोठा अनर्थ टळला. दोन दिवसांत कारवाई न केल्यास बघ काय करतो, असा सज्जड दमही या वेळी आमदार कडूंनी दिल्याने मंत्रालयात एकच गोंधळ उडाला होता. 

महापरीक्षा पोर्टलच्या भोंगळ कारभाराबाबत बुधवारी आमदार बच्चू कडू आणि प्रहार विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी आय टी संचालक प्रसाद पी यांच्या मंत्रालयातील कार्यालयात गेले होते. मात्र, या वेळी प्रसाद यांनी आमदारांना करता हूँ देखूँगा आप को क्‍यू बतावू अशा भाषेत उत्तरे दिली. त्यामुळे आमदार बच्चू कडू यांना राग अनावर झाला, त्यांनी टेबलावरील लॅपटॉप प्रसाद पी यांच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी वेळीच अडवल्याने माठा अनर्थ टळला. या वेळी मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. या वेळी परीक्षेच्या नावाखाली अधिकारी आय टी कंपन्यांना कॉन्ट्रॅक्‍ट देऊन पैसे खात असल्याचा आरोप आमदार कडू यांनी केला आहे. 

राज्य शासनाकडून घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा ज्या महापरीक्षा पोर्टलद्वारे घेतल्या जातात त्याच्या ढिसाळ कारभारामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत असल्याचा आरोप प्रहार विद्यार्थी संघटनेने केला आहे. गेल्या काही महिन्यांत अन्न व पुरवठा निरीक्षक, राज्य गुप्त वार्ता अधिकारी, नगर परिषद, नगरपंचायत भरती या परीक्षा घेण्यात आल्या आहेत. मात्र, या वेळी विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. तसेच अडचणी सोडविण्यासाठी विभागामार्फत दिलेल्या फोन, ई मेलचा काहीही अर्थ नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापरीक्षा पोर्टल बंद करून पुन्हा सरकारच्या mpsc.gov.in या पोर्टलद्वारे सर्व परीक्षा घ्याव्यात, अशी मागणी प्रहार विद्यार्थी संघटनेने केली आहे. या प्रकरणी 27 सप्टेंबर रोजी आमदार कडू यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात, तर 1 ऑक्‍टोबरला मुंबईत विद्यार्थी आंदोलन करणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com