आरोपींशी काळेच्या भेटीचा संशय

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 ऑगस्ट 2018

मुंबई - पत्रकार गौरी लंकेश हत्येतील आरोपी अमोल काळे याचे धागेदोरे डॉ. दाभोलकर हत्येतील आरोपींशी जुळले आहेत. काळेने औरंगाबाद आणि जालन्यात दाभोलकर हत्या व नालासोपारा स्फोटकांप्रकरणातील आरोपींची भेट घेतल्याचा संशय आहे. त्यामुळे सीबीआय व कर्नाटक पोलिस या ठिकाणी पडताळणी करत आहेत. दरम्यान, दाभोलकर हत्येत वापरलेली दुचाकी ही माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरकडे असल्याचा संशय आहे.

डॉ. दाभोलकर यांचे मारेकरी शरद कळसकर आणि सचिन अंदुरे औरंगाबादशी संबंधित आहेत. तसेच गौरी लंकेश हत्येतील आरोपी अमोल काळेही औरंगाबादमध्ये काही दिवस वास्तव्याला होता. तेथील एका लॉजवर तो थांबला होता. त्याबाबत पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांचे पथक तेथे गेले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

‘सनातन’च्या झाडाझडतीच्या सूचना
औरंगाबाद : विचारवंतांच्या हत्या व त्यानंतर तपासात कट्टर हिंदुत्ववाद्यांच्या सहभागाची शक्‍यता उघड होत असताना, ‘सनातन’ची गोपनीय पातळीवर झाडाझडती घेण्यात येत आहे.  संघटनेचे कामकाज, कार्यकर्त्यांची माहिती गोळा केली जात आहे, याबाबत एक पत्र तपास यंत्रणांना मिळाले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याला दुजोरा दिला.

Web Title: Dabholar Pansare gauri Lankesh Murder Case Accused Amol kale