दाभोलकर-पानसरेप्रकरणी तपास अहवाल हायकोर्टात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

मुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासाबाबतचा सीलबंद अहवाल सीबीआय आणि विशेष तपास पथकाने शुक्रवारी (ता. 21) मुंबई उच्च न्यायालयात सादर केला.

मुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासाबाबतचा सीलबंद अहवाल सीबीआय आणि विशेष तपास पथकाने शुक्रवारी (ता. 21) मुंबई उच्च न्यायालयात सादर केला.
दाभोलकर यांच्या हत्येचा तपास सीबीआय करत असून, पानसरे यांच्या हत्येच्या तपासासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक स्थापन केले आहे. दाभोलकर आणि पानसरे यांच्या निकटवर्तीयांनी दाखल केलेल्या याचिकांवर शुक्रवारी न्या. एस. सी. धर्माधिकारी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. दोन्ही तपास यंत्रणांनी तपासाचा वेग वाढवावा आणि ठोस निष्कर्ष द्यावा, असे निर्देश न्यायालयाने या वेळी दिले.

या प्रकरणांत राज्य सरकारने विशेष सरकारी वकील म्हणून ए. मुंदरगी यांची नियुक्ती केली आहे. याबाबत स्पष्टता आणणारा सरकारी निर्णय दाखल करण्याचे निर्देशही खंडपीठाने दिले. याचिकादारांच्या वतीने ऍड. प्रेरणा पाटील यांनी बाजू मांडली. या याचिकेवरील पुढील सुनावणी 22 जूनला होणार आहे.

Web Title: dabholkar-pansare case report in high court