Uddhav Thackeray : मालेगावातील सभेपूर्वी शिंदे गटाचे उत्तर सभेचे संकेत! दादा भुसे म्हणाले, जास्त बोलाल तर...

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

शिवसेनेत बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची पहिली सभा मालेगाव येथे होत आहे. मालेगावातील या रॅलीत मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांना आकर्षित करण्यासाठी उर्दूमध्ये बॅनरही लावण्यात आले आहेत. दरम्यान शिंदे गटातील नेते दादा भुसे यांनी उत्तर सभा घेण्याचे संकेत दिले आहेत. उद्धव ठाकरे जास्त बोलले तर उत्तर सभा घ्यावी लागेल, असे दादा भुसे म्हणाले. 

दादा भुसे म्हणाले, राजकारणात मत मांडत असताना काही पातळीपर्यंत टीका करण्याचे देखील अधिकार आहेत. पण ज्या पद्धतीने संजय राऊत खोटे बोलत आहेत. जनतेची दिशाभूल करत आहेत. मालेगावच्या जनतेला आम्ही काय आहोत, हे माहित आहेत. ते जास्त बोलेले तर आम्ही उत्तर सभा घेऊ. 

संजय राऊत म्हणाले, जेवढ्या दिशांना सभा घ्यायच्या आहेत तेवढ्या घ्या, तुमची दुर्दशा ठरलेली आहे. आम्ही त्यांना अनेक दिशांची माहिती देऊ, कोणतीही दिशा त्यांना पावणार नाही. कारण त्यांची दुर्दशा झाली आहे. मालेगावच्या सभेने त्यांची हातभर xxxx फाटली आहे. 

Uddhav Thackeray
Crime News : ठाणे हादरले! मोबाईल चोरीपायी धावत्या लोकलमध्ये दिव्यांगाला जाळण्याचा प्रयत्न, गर्दुल्ला फरार

उद्धव ठाकरे सपत्नीक मालेगावत दाखल झाले आहेत. शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे यांनी उद्धव ठाकरे यांचं स्वागत केले आहे. अद्वय हिरे हे दिवंगत माजी मंत्री भाऊसाहेब हिरे यांचे वंशज आहेत. दादा भुसे यांच्याविरोधात अद्वय हिरे यांची ताकद वाढवण्यासाठी उद्धव ठाकरे आज मालेगाव येथे सभा घेत आहेत. 

Uddhav Thackeray
Sushma Andhare : ...त्यालाही लायकी लागते; शिरसाटांच्या 'त्या' टीकेला सुषमा अंधारेंचे चोख प्रत्युत्तर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com