फाळके यांचा शिल्पगौरव!

फाळके यांचा शिल्पगौरव!

मुंबई - भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचे १५० वे जयंती वर्ष ३० एप्रिलपासून सुरू झाले. त्यानिमित्त प्रसिद्ध शिल्पकार विनय वाघ यांनी चर्नी रोडमधील स्टुडिओत साकारलेल्या फाळके यांच्या पहिल्या संकल्पना शिल्पाला त्यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर यांनी मंगळवारी अभिवादन केले. 

फाळके यांचे कार्य सर्व स्तरापर्यंत पोहचावे म्हणून त्यांचे शिल्प तयार करण्यात आले आहे. त्यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांना त्यातून मानवंदना देण्यात आली आहे, असे शिल्पकार वाघ म्हणाले. संकल्पना शिल्पाचे पहिले ‘क्‍ले मॉडेल’ २०१७ मध्ये तयार केले गेले होते. शिल्प तयार करण्यासाठी सहा महिने अभ्यास केला. चंद्रशेखर पुसाळकर यांनी त्यांचे वर्णन आपली आई म्हणजे दादासाहेबांची मुलगी वृंदा यांच्याकडून ऐकले होते. त्या वर्णनावरून दादासाहेबांचे शिल्प तयार करण्यात आले. 

चंद्रशेखर यांची अंगकाठी काही प्रमाणात आजोबांसारखी आहे. म्हणून त्यांना समोर बसवून शिल्पाला आकार दिला. शिल्प साकारण्यासाठी आठ महिने लागले. शिल्प पाण्यात ठेवले, तरी त्यावर कोणताही परिणाम होणार नाही. दादासाहेबांच्या १५० व्या जयंतीला त्याच पुतळ्याचे प्रगत मॉडेल तयार करून त्रिमितीय परिणाम देणार अाहे, असे वाघ यांनी सांगितले.

संकल्पना शिल्पात टिळकांची प्रतिमा
दादासाहेब फाळके यांच्यावर लोकमान्य टिळकांचा प्रभाव होता. म्हणूनच संकल्पना शिल्पात टिळक यांची प्रतिमा समाविष्ट करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पत्नी सरस्वती फाळके यांची प्रतिमा, निवासस्थान असलेला हौदाचा बंगला, ‘राजा हरिश्‍चंद्र’ चित्रपटातील मंच, फाळके पुरस्कार, सेन्सॉर बोर्डाकडून मिळालेले पहिले प्रमाणपत्र, ग्रामोफोन, त्यांचा विल्यम्सन्स कॅमेरा, फिल्म प्रोजेक्‍टर, हस्ताक्षर, लेखणी, चष्मा, दागिने आणि हातात असलेली फिल्म आदी प्रतिकृतींचा संकल्पना शिल्पात वापर केला गेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com