गो गो गोविंदा...; दहीहंडीनिमित्त थरांवर थर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 सप्टेंबर 2018

'हाथी घोडा पालखी, जय कन्हैय्या लाल की' म्हणत थरावर थर रचत गोविंदा दहीहंडी फोडताना जागोजागी दिसत आहेत. अशीच काही दहीहंडीची दृश्ये....

संपूर्ण देशभर श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त हर्षोल्लासात दहीहंडी उत्सव साजरा केला जात आहे. मुंबईत दहीहंडी उत्सवाची तर धुम असते. देशभरात अनेक मंडळे दहीहंडी कार्यक्रम आयोजित करुन सिनेकलाकारांना या उत्सवाचे आकर्षण म्हणून आमंत्रित करतात. 'हाथी घोडा पालखी, जय कन्हैय्या लाल की' म्हणत थरावर थर रचत गोविंदा दहीहंडी फोडताना जागोजागी दिसत आहेत. अशीच काही दहीहंडीची दृश्ये....

प्रभादेवी परिसरातील सर्वात मोठा गोविंदा पथक समजल्या जाणाऱ्या प्रभा-विनायक सोसायटीच्या यंग प्रभादेवी क्रीड़ा मंडळाने यंदा अवयव दानाचा संकल्प केला असून 'सकाळ'च्या मोहिमेस पाठिंबा दिला असल्याचे मंडळाचे अध्यक्ष रविंद्र देसाई यांनी सांगितले. गेल्या वर्षी प्लास्टिक बंदी विरोधी मोहिम काढत परिसरातून जनजागृती करण्यात आली होती. सामाजिक बांधिलकी जपत वर्षभरात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवित असल्याचे सचिव किसन सारंग यांनी सांगितले.


सगळ्यात वेगानं दहीहंडी फोडणारा मुंबईतील हिंदमाता पथक सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. अवघ्या 15 सेकंदात 5 थर रचत दहीहंडी फोडण्याचा या पथकाने विक्रम केला आहे. 

दादर येथे आल्यानंतर जागेला मान देताना गोविंदा पथक...

गोपाळकाला निम्मित दादरमध्ये पाच थराचा मनोरा उभारुन दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करताना उत्साही गोंविदा...


चेंबूर येथील दहीहंडी उत्सवात शिवसेना आमदार प्रकाश फातर्पेकर यांनी सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत दै. सकाळ च्या अवयवदान मोहिमेला सक्रीय पाठिंबा देताना स्वतः अवयवदानाचा फॉर्म ही भरला.
 

दहीहंडी उत्सवात अनेक गोविंदा थर रचताना जखमीही होतात. अशा जखमी गोविंदाची मुंबईतील आतापर्यंतची आकडेवारी समोर आली आहे. 

  • जेजे हॉस्पिटल - 1
  • केईएम - 3
  • अग्रवाल रूग्णालय- 1
  • व्हि एन देसाई रूग्णालय - 1

गोकुळ अष्टमीच्या निमित्तानं गोविंदाचा उत्साह वाढवण्यासाठी मराठी अभिनेते संदीप कुलकर्णी, ह्रषिकेश जोशी आणि अमोल पराशर यांचं हे खासं गाणं पाहा..

'राधे राधे हरी हरी हरी बोल' हे जन्माष्टमी निमित्त खास गाणं गोविंदाचा उत्साह वाढवण्यासाठी दिग्विजय जोशी यांनी गायलेलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dahihandi celebrating everywhere in India