नाइट लाइफमुळे शांतता, सुरक्षिततेला धोका - शेलार

Ashish-Shelar
Ashish-Shelar

मुंबई - नाइट लाइफमुळे स्थानिक पोलिस, वाहतूक पोलिस, महापालिका, कामगार विभागासह अनेक यंत्रणांवर ताण येणार असून, स्थानिक नागरिकांची व महिलांची सुरक्षितता धोक्‍यात येऊ शकते, अशी भीती भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे.

ॲमेझॉनसारख्या कंपन्यांमुळे इथला स्थानिक व्यापारी अडचणीत आहे. व्यापार, मॉल आणि व्यापाऱ्यांना जरूर मदत करायला हवी. पण डिस्को, पब, बार, लेडीज बार २४ तास सुरू ठेवण्याची आवश्‍यकता काय, असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे. निवासी भागात रात्रभर बार, पब, सुरू ठेवण्यास भाजपने विरोध केला आहे. शेलार म्हणाले, ‘‘जो मुंबईकर दिवसभर थकून आपल्या घरी हक्काची झोप घेतो अशा मुंबईकरांची झोपमोड करणारा, शांतता भंग करणारा हा निर्णय आहे. या निर्णयामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आधीच मुंबई पोलिसांवर कामाचा ताण आहे. त्यांच्याकडे मनुष्यबळ कमी आहे. वाहतूक पोलिस, महापालिकेच्या काही विभागांना २४ तास काम करावे लागणार आहे. याबाबत सरकारने काहीही विचार केलेला दिसत नाही. लेडीज बारमुळे गुन्हेगारी वाढेल, अशी भीतीही भाजपने व्यक्‍त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com