मागास जिल्ह्यांच्या कालबद्ध विकासासाठी डॅशबोर्ड सिस्टीम - मुख्यमंत्री 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

मुंबई - राज्यातील नंदुरबार, गडचिरोली, वाशिम, उस्मानाबाद या चार आकांक्षित जिल्ह्यांच्या कालबद्ध विकासासाठी नीती आयोगाकडून उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी डॅशबोर्ड सिस्टीम तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आकांक्षित जिल्ह्यांची आढावा बैठक झाली. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नंदुरबार, गडचिरोली, वाशीम, उस्मानाबाद येथील जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. 

केंद्र आणि नीती आयोगाने सूचित केल्यानुसार या चार जिल्ह्यांचा सर्वंकष विकास करण्यासाठी आरोग्य व पोषण, शिक्षण, कृषी व जलसंपदा, आर्थिक समावेश व कौशल्य निर्माण, मूलभूत सुविधा आदी विभागांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. यात पंतप्रधान उज्ज्वला योजना, सौभाग्य (सहज बिजली घर योजना), उजाला योजना, पंतप्रधान जन-धन योजना, पंतप्रधान जीवनज्योती विमा योजना, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना, मिशन इंद्रधनुष्य या योजनांना समावेश असून, या योजनांची जिल्हास्तरावर अधिक प्रभावी अंमलबजावणी करावी. या जिल्ह्यांतील विकासकामांचे ठरवून दिलेले उद्दिष्टे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यासाठी दर दोन महिन्यांनी आढावा घेण्यात यावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केल्या. 

Web Title: Dashboard system for periodic development of backward districts Says devendra fadnavis