Loksabha 2019 : दौंडमध्ये मतदारांची सायंकाळी सहानंतर गर्दी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

दौंड विधानसभा मतदारसंघात एकीकडे मतदानासाठी नवमतदारांमध्ये उत्साह असताना रखरखत्या उन्हाचा एकूण मतदानावर परिणाम झाला. अनेकांनी सकाळी लवकर मतदार केले. तर, दौंडमध्ये सायंकाळी  पावणेसहानंतरही केंद्रांवर मतदारांच्या मोठ्या रांगा होत्या.

दौंड : दौंड विधानसभा मतदारसंघात एकीकडे मतदानासाठी नवमतदारांमध्ये उत्साह असताना रखरखत्या उन्हाचा एकूण मतदानावर परिणाम झाला. अनेकांनी सकाळी लवकर मतदार केले. तर, दौंडमध्ये सायंकाळी  पावणेसहानंतरही केंद्रांवर मतदारांच्या मोठ्या रांगा होत्या.

दौंड तालुक्‍यातील ३०७ मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजता मतदान सुरू झाले. भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांनी राहू (ता. दौंड) येथे सकाळीच सहकुटुंब मतदान केले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार रमेश थोरात यांच्या खुटबाव गावात सकाळीच मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. केडगाव येथे अंध महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. 

यवत व दौंड शहरात मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. केडगाव येथील आठवडे बाजार मंगळवारी मतदानामुळे रद्द करण्यात आला होता, परंतु भाजीपाला विक्रेत्यांनी बोरी येथे दुकाने थाटली होती. 

खुटबाव येथे एका केंद्रावर ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दोन तास मतदानप्रक्रिया विस्कळित झाली होती, परंतु याची माहिती मिळताच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड व तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी तातडीने पर्यायी ईव्हीएम यंत्र पाठवून मतदानप्रक्रिया पूर्ववत केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daund voters in the evening rush