हेलिकॉप्टर कोणी घेईना... 

दीपा कदम 
बुधवार, 11 एप्रिल 2018

मुंबई - राज्य सरकारच्या मालकीची असलेली डाउफिन हेलिकॉप्टर निवृत्त झाल्यानंतर शैक्षणिक संस्थेला अभ्यासासाठी दान करण्याचा निर्णय सप्टेंबर 2017 मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला; मात्र अद्यापही या हेलिकॉप्टरला स्वीकारण्यास कोणती शैक्षणिक संस्था तर तयार नाहीच; पण भंगारवालेदेखील त्याकडे ढुंकून पाहायला तयार नाहीत. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या वर्षभरात हेलिकॉप्टरच्या अपघातातून तीन वेळा बचावल्यानंतर राज्य सरकारने जुनी हेलिकॉप्टर निकाली काढून दोन नवीन हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी एक मुख्यंत्र्यांसाठी, तर दुसरे गृह विभागाला नक्षलवादी भागात कारवाई करण्यासाठी म्हणून दोन हेलिकॉप्टरची खरेदी अंतिम टप्प्यात आहे. त्याचवेळी मंत्रिमंडळ बैठकीत डाउफिन हे हेलिकॉप्टर भंगारात काढण्याऐवजी चांगल्या शैक्षणिक संस्थेला दान करण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र योग्य संस्था मिळत नसल्याने ते विभागाच्याच ताब्यात आहे. 

एक हेलिकॉप्टर उभे करण्यासाठी 100 चौरस फुटांची सुरक्षित जागा लागते. अशा प्रकारच्या बंद असलेल्या हेलिकॉप्टर किंवा विमानामध्ये चढून त्याचे इंजिन तपासणे, आतून रचना अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होत असतो; मात्र कुठल्याच मोठ्या शैक्षणिक संस्था यासाठी पुढे येत नसल्याने नुसत्याच जमिनीवर उभ्या असणाऱ्या हेलिकॉप्टरच्या मेंटेनन्सचा खर्चाचा भार वाढतो आहे, तर दुसऱ्या बाजूला भंगारवालेदेखील हेलिकॉप्टर ते उचलून आणून देण्याचा आग्रह करत असल्याने तेदेखील आता विभागाला परवडेनासे झाले आहे.

Web Title: Dauphin helicopter donations for the study of educational institutions