बारामती एसटी आगाराचा दिवसाच्या उत्पन्नाचा विक्रम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

बारामती शहर -येथील राज्य परिवहन मंडळाच्या बारामती-पुणे-बारामती या मार्गावरील विनावाहक विनाथांबा गाडीने रविवारी (ता. ११) उत्पन्न व प्रवासी वाहतूक संख्येचे आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढले. दिवाळीच्या सुटीच्या पार्श्वभूमीवर रविवारी एकाच दिवसात ४० गाड्यांच्या मदतीने तब्बल ८२ फेऱ्या करत २७२८ प्रवाशांची वाहतूक केली. बारामती आगारातील सर्व बसगाड्यांनी मिळून २५ हजार २३३ प्रवाशांची वाहतूक करत नवीन विक्रम प्रस्थापित केला. एसटीने १७ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले, जे दैनंदिन सरासरी १२ लाखांपर्यंत असते.

बारामती शहर -येथील राज्य परिवहन मंडळाच्या बारामती-पुणे-बारामती या मार्गावरील विनावाहक विनाथांबा गाडीने रविवारी (ता. ११) उत्पन्न व प्रवासी वाहतूक संख्येचे आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढले. दिवाळीच्या सुटीच्या पार्श्वभूमीवर रविवारी एकाच दिवसात ४० गाड्यांच्या मदतीने तब्बल ८२ फेऱ्या करत २७२८ प्रवाशांची वाहतूक केली. बारामती आगारातील सर्व बसगाड्यांनी मिळून २५ हजार २३३ प्रवाशांची वाहतूक करत नवीन विक्रम प्रस्थापित केला. एसटीने १७ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले, जे दैनंदिन सरासरी १२ लाखांपर्यंत असते. चालकांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे प्रवाशांना अधिकाधिक सेवा देता येणे शक्‍य झाल्याचे आगारप्रमुख अमोल गोंजारी यांनी सांगितले.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शनिवार, रविवार व सोमवारीही बारामती बस स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. त्यातही पुण्याला जाण्यासाठी प्रवाशांच्या रांगा लागलेल्या होत्या. या काळात बस उपलब्ध करून देत प्रवाशांना कमीत कमी वेळ बस स्थानकावर थांबावे लागेल याची काळजी एसटीच्या अधिकाऱ्यांनी घेतली. उपलब्ध कर्मचारी व बस यांचा मेळ घालत अनेकदा लोकांची नाराजी पत्करून त्यांनी प्रवाशांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला. 

बारामती-पुणे-बारामती या एकाच मार्गावर एकाच दिवसात १७ लाखांचे उत्पन्न हा बारामती आगाराच्या आजपर्यंतच्या इतिहासातील उत्पन्नाचा विक्रम आहे.
- अमोल गोंजारी,  एसटी आगारप्रमुख, बारामती

Web Title: Day Record of income of Baramati ST Depo