DCM devendra fadanvis Meetings start order to resolving reservation issues mumbai
DCM devendra fadanvis Meetings start order to resolving reservation issues mumbaidevendra fadanvis

आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लावण्याच्या सूचना!

उपमुख्यमंत्री कार्यालयाचा कार्यभार देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला; बैठकांना प्रारंभ

मुंबई : मुख्यमंत्रिपदाऐवजी उपमुख्यमत्रिपदाच्या खुर्चीत बसावे लागल्याने नाराज असल्याची चर्चा असतानाच नवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दुपारीच मंत्रालयात आपला पदभार स्वीकारला आणि बैठकांना प्रारंभ केला. पहिल्याच भेटीत फडणवीस यांनी दालन आणि संबंधित विभागांची पाहणी करून काही बाबींत बदल करण्याच्या सूचना केल्या. ठाकरे सरकार कोसळल्यानंतर नव्या सरकारमध्ये फडणवीस हे मुख्यमंत्रिपदावर बसणार असल्याचे चित्र होते. मात्र, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी या पदावर एकनाथ शिंदे यांना बसवून फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद दिले. देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मंत्रालयात येऊन उपुमख्यमंत्रिपदाचा कारभार सुरू केला. भाजपचे नेते आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर फडणवीस यांनी आपल्या कामांचा आढावा घेतला. त्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या प्रक्रियेची माहिती घेऊन, यासंदर्भातील कामे वेगाने आणि योग्य पद्धतीने करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न लवकर मार्गी लावण्याचा सूचना फडणवीस यांनी केल्या आहेत. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.ओबीसी आरक्षणावरून उद्धव ठाकरे सरकार आणि भाजपमध्ये मोठा संघर्ष झाला होता. ठाकरे सरकारमुळेच ओबीसींचे आरक्षण केल्याचा ठपका भाजपने ठेवला होता. उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यभार घेताच, फडणवीस यांनी बैठक घेऊन पुढील कार्यवाहीला वेग दिला.

मुंबईतील कारशेडबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिकेचा आम्ही विचार करू, असे फडणवीस यांनी ्पष्ट केले. नव्या सरकारच्या काळात या प्रकल्पाबाबत ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली होती. "माझा राग मुंबई आणि त्यातील प्रकल्पांवर काढू नको. पर्यावरणाचा विचार करा, असा आग्रह ठाकरे यांनी धरला होता. त्यावर विचार करण्यात येईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com