दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत

Dearness
Dearness

महागाईत भरमसाठ वाढ होत असली तरी निवृत्तिवेतनधारकांचे पेन्शन मात्र अजूनही तुटपुंजेच आहे. निवृत्तीवेळी मिळालेल्या पुंजीवरील व्याजावर काटकसर करून गुजराण करणाऱ्या वरळीतील बी. डी. डी चाळीत राहणाऱ्या विठोबा धाडवे यांच्यासाठी महागाईने जगण्याचा संघर्ष तीव्र केला आहे. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आणि औषध उपचारांचा न परवडणारा खर्च यामुळे धाडवे दांपत्याला जगणे नकोसे झाले आहे. ‘बेस्ट’चे तिकीटही परवडत नसल्याने रोजची पायपीट करून ते जिवन जगत आहेत.

काटकसरीवर भर
महागाईने धाडवे यांचे मासिक बजेट कोलमडले आहे. रेशनवरील मिळणारे धान्य निकृष्ट दर्जाचे असल्याने त्यांना खुल्या बाजारातील धान्य खरेदी करावे लागते. सण उत्सवातील गोडधोड पदार्थ गेल्या वर्षभरापासून त्यांच्या मुखाला लागलेले नाहीत. मांसाहार वर्ज्य केला असून शाकाहारही परवडत नाही, असे ते सांगतात. दहा वर्षांत त्यांनी सिनेमा बघितलेला नाही; तसेच गावीदेखील गेलेले नाहीत. कपडालत्ता, दैनंदिन छोटा मोठा खर्च करताना धाडवे यांची दमछाक होत आहे.

पेन्शनवाढ किरकोळ; महागाई मात्र तिप्पट
धाडवे भारत टेक्‍स्टाईलमधून २००३ मध्ये स्वेच्छा निवृत्त झाले. तेव्हापासून २०१५ पर्यंत त्यांना दरमहा ७२५ रुपये पेन्शन मिळत होती. २०१५ मध्ये पेन्शन केवळ ६८ रुपयांनी वाढली. मात्र त्या तुलनेत महागाईत तिप्पट वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात वैद्यकीय सेवा आणि उपचारांचा खर्च प्रचंड वाढला. परिणामी, तुटपुंज्या उत्पन्नात धाडवे कुटुंब दररोज जगण्याचा संघर्ष करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com