महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक असली तरी...

वृत्तसंस्था
शनिवार, 23 मे 2020

- कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यूदर इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कमी

नवी दिल्ली : सध्या देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यातील सर्वाधिक संख्या ही महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यूदर इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कमी आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यूदर पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आहे. तेथे 8.40 टक्के मृत्यूदर आहे. तर त्या खालोखाल गुजरात येते. सध्या गुजरातमध्ये 5.99 टक्के मृत्यूदर आहे. तर मध्य प्रदेशमध्ये 4.51 टक्के आहे. पण महाराष्ट्रात हा दर 3.49 इतका आहे. काल (शुक्रवार) कोरोनाग्रस्त रुग्णांची सर्वाधिक नोंद झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात 2940 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 857 रुग्णांवर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 44, 582 वर गेली आहे.

Coronavirus

याशिवाय यातील विशेष बाब म्हणजे कोरोना व्हायरसची लागण झालेल्या 12,583 रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

दीड हजारपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू

महाराष्ट्रात वाढत चाललेली कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या हा एका चिंतेचा विषय बनत आहे. तर दुसरीकडे राज्यात आत्तापर्यंत 1517 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर शुक्रवारी 63 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

CoronaVirus

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तिथं नाही एकही मृत्यू...

देशात अशी काही 10 ठिकाणं आहेत तिथं एकाही कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तर 8 ठिकाणी मृतांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. याबाबतची माहिती शुक्रवारी देण्यात आली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death Rate of Corona Infected Patients in Maharashtra are Low