ट्रेकिंगदरम्यान डोंगरावरून पडून विद्यार्थिनीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 जानेवारी 2019

बदलापूर :  बदलापूर येथील कात्रप विद्यालयातील स्काऊट गाईडच्या कॅम्प दरम्यान ट्रेकिंग करताना डोंगरावरून पाय घसरून पडल्याने दहावीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर एक विद्यार्थिनी जखमी झाली आहे. पूर्वा रवींद्र गांगुर्डे (15) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. तसेच जखमी अपूर्वा खरात या विद्यार्थिनीवर जवळच्याच एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बदलापूर पूर्वेकडील कात्रप विद्यालयात शिकणाऱ्या 9 वी आणि 10 वीच्या स्काऊड गाईडच्या विद्यार्थ्यांचा कॅम्प कात्रप भागातील डोंगरावर गेला होता. सकाळी 7 च्या सुमारास या विद्यार्थ्यांनी डोंगर चढण्यास सुरवात केली. 8 वाजता डोंगराच्या माथ्यावर पोचल्यावर त्यांनी खाली उतरायला सुरवात केली. मात्र, डोंगराच्या मध्यभागी उतारावर आल्यावर दोन विद्यार्थिनीचा तोल गेल्याने त्या घरंगळत खाली आल्या. यात पूर्वा आणि अपूर्वा या दोघी गंभीर जखमी झाल्या. या दोघींना जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच पूर्वाचा मृत्यू झाला. तर अपूर्वा यात जखमी झाली असून, तिच्यावर कात्रप विभागातील मॅट्रिक्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे पूर्वा राहत असलेल्या कात्रप परिसरात शोककळा पसरली आहे.

Web Title: Death of the student due to Collapse from Mountain while trekking