मंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून वाद

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

मुंबई - नरभक्षक ‘अवनी’ वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्यावरून मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी झाली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री आपल्याला लक्ष्य करणार, हे गृहीत धरून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार या बैठकीला उशिरा पोचले. मंत्रिमंडळ बैठकीची नियोजित वेळ सकाळी अकरा वाजता असताना मुनगंटीवार हे उशिरा पोचले. तोपर्यंत इतर विभागांच्या प्रस्तावावर चर्चा करून मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मुनगंटीवार उपस्थित झाल्यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी ‘अवनी’च्या हत्येचा मुद्दा उपस्थित करीत वनमंत्र्यांना फैलावर घेतले. ही खडाजंगी सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक आवरती घेतली.

मुंबई - नरभक्षक ‘अवनी’ वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्यावरून मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी झाली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री आपल्याला लक्ष्य करणार, हे गृहीत धरून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार या बैठकीला उशिरा पोचले. मंत्रिमंडळ बैठकीची नियोजित वेळ सकाळी अकरा वाजता असताना मुनगंटीवार हे उशिरा पोचले. तोपर्यंत इतर विभागांच्या प्रस्तावावर चर्चा करून मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मुनगंटीवार उपस्थित झाल्यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी ‘अवनी’च्या हत्येचा मुद्दा उपस्थित करीत वनमंत्र्यांना फैलावर घेतले. ही खडाजंगी सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक आवरती घेतली. शिवसेनेचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी न्यायालयीन चौकशीची मागणी केली, तर मुनगंटीवार यांनी आपण स्वतःहून न्यायालयीन चौकशीची मागणी केल्याचे सांगितले.

‘अवनी’ची हत्या केली असून, ज्यांनी हत्या केली आहे, तेच चौकशी करीत आहेत. हा केवळ चौकशीचा फार्स आहे. त्यामुळे या हत्येची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे.
- रामदास कदम, पर्यावरणमंत्री

‘अवनी’च्या मृत्यूची चौकशी कोणत्याही समितीमार्फत होऊ द्या. कदम यांनी मागणी केली असली याबद्दल मला माहीत नाही; मात्र मी स्वतः फडणवीस यांच्याकडे न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.
- सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Debate on Avani in Cabinet meeting