31 डिसेंबरला बार राहणार रात्रभर उघडे

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 29 डिसेंबर 2018

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत रात्री देखील हॉटेल सुरु राहण्याची परवानगी राज्य सरकारच्या गृहखात्याकडे मंजुरीच्या प्रतिक्षेत होती. त्यानंतर, आदित्य ठाकरे यांनी पुण्यातही रात्रीचा दिवस करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले होते. 

मुंबई- मुंबई, ठाणे, नवी मुंबई बरोबरच पुण्यात दारूचे बार रात्रभर उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभाग आणि गृह खात्यानं संयुक्तरित्या हा निर्णय घेतला आहे, असे समजते. संध्याकाळी उशिरा याबाबत पत्रक जाहीर करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

दरम्यान, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत रात्री देखील हॉटेल सुरु राहण्याची परवानगी राज्य सरकारच्या गृहखात्याकडे मंजुरीच्या प्रतिक्षेत होती. त्यानंतर, आदित्य ठाकरे यांनी पुण्यातही रात्रीचा दिवस करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले होते. 

आदित्य ठाकरे यांनी पत्रात लिहिले आहे, की विशेष करुन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ही परवानगी तातडीने दिली जावी. अनिवासी भागातील मनोरंजनाची ठिकाणे (हॉटेल, पब, मॉल) रात्रभर सुरू ठेवली जावीत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे यांसारख्या अनेक शहरवासीयांना नवीन वर्षाचे आगमन साजरे करण्याची इच्छा आहे. तरी, आपण कायदेशीर मनोरंजनाची व आनंदोत्सव साजरा करण्याची सर्व ठिकाणे खासकरून अनिवासी भागात रात्रभर सुरु ठेवावी. या निर्णयाने संर्व सुरक्षित आणि नियमित जागांवरून आपल्या राज्याच्या उत्पादनात वाढ होऊन अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील व लाखो भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळतील असेही त्यांनी म्हटले होते.

Web Title: On December 31 the bar will be open overnight