डिसेंबरअखेर राज्यात दहा हजार कोटींचे रस्ते - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 सप्टेंबर 2016

कवठेमहांकाळ - सरकारने सेवा हमी विधेयक तयार केले असून, जे काम करणार नाहीत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील. त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांनो, जनतेला चांगल्या व वेळेत सुविधा द्या, जेणेकरून गुन्हे दाखल करण्याची वेळच येणार नाही, अशी सूचना पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली; तसेच डिसेंबरअखेर महाराष्ट्रात दहा हजार कोटींचे रस्ते होतील, असा विश्वासही दिला.
 
कवठेमहांकाळ येथील महसूल विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या वतीने उभारलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय भवनाचा प्रारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाला, या वेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले, ‘सर्वसामान्य जनतेला चांगल्या व वेळेत सुविधा मिळाव्यात, यासाठी सेवा हमी विधेयक आणले आहे. जनतेचे जीवन गुंतागुतीचे बनले असून, ते सोपे करण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे. पाण्याची उपलब्धता, त्याचे नियोजन, ठिबक शेतमालाला भाव यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. केंद्र सरकारने राज्यात सत्तेचाळीस हजार कोटींच्या रस्त्यांचे रूपांतर केले आहे. येत्या डिसेंबरअखेर राज्य सरकार दहा हजार कोटींचे रस्ते तयार करेल.‘‘ 

Web Title: December ten thousand crore state roads