राज्यातील 67 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगूल वाजले; 31 ऑगस्टला मतदान

राज्यातील 67 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगूल वाजले; 31 ऑगस्टला मतदान

मुंबई : विविध 14 जिल्ह्यांतील 67 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तर 2 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी, नवनिर्मित चंदगड (जि. कोल्हापूर) नगरपंचायतीच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 31 ऑगस्टला मतदान घेण्यात येणार आहे. 3 सप्टेंबरला मतमोजणी होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली.

सहारिया यांनी सांगितले, की नामनिर्देशनपत्रे 3 ते 14 ऑगस्ट 2019 या कालावधीत दाखल करता येतील. 4, 10, 11 व 12 ऑगस्ट 2019 रोजी शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. 16 ऑगस्ट 2019 रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होईल. अपील नसलेल्या ठिकाणी 22 ऑगस्ट 2019 ही नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. अपील असलेल्या ठिकाणी न्यायालयाच्या निकालाच्या तिसऱ्या दिवसापर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. 31 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 3 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.

तसेच संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे. 1 ऑक्टोबर 2019 ते 13 डिसेंबर 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नवनिर्मित अशा एकूण 67 ग्रामपंचायतींसाठी ही सार्वत्रिक निवडणूक होत आहे. सर्व ठिकाणी नामनिर्देशनपत्रे 9 ते 16 ऑगस्ट 2019 या कालावधीत स्वीकारले जातील, असेही सहारिया यांनी सांगितले.

शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी 19 ऑगस्ट 2019 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 21 ऑगस्ट 2019 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 31 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 3 सप्टेंबर 2019 रोजी होईल.

सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या : ठाणे- 6, रायगड- 9, रत्नागिरी- 4, सिंधुदुर्ग- 3, नाशिक- 25, धुळे- 1, सातारा- 4, सोलापूर- 1, कोल्हापूर- 1, उस्मानाबाद- 3, अकोला- 2, यवतमाळ- 1, वर्धा- 5, आणि चंद्रपूर- 2. एकूण- 67

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com