निर्णय बदलला! शिक्षकांचे वर्गात नव्हे आता ऑफिसमध्ये फोटो

आता शिक्षकांचे फोटो वर्गात नव्हे तर ‘शिक्षक परिचय’ म्हणून शाळेच्या कार्यालयात लावण्याचे नवे आदेश दिल्याचा निर्णय सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
शिक्षक
शिक्षक sakal

सोलापूर : ‘माझे गुरुजी’ मोहिमेअंतर्गत सर्व वर्गशिक्षकांचे फोटो त्यांच्या वर्गात लावण्याचे बंधन शालेय शिक्षण विभागाने घातले. त्याला शिक्षक संघटनांनी जोरदार विरोध केला. त्यानंतर आता शिक्षकांचे फोटो वर्गात नव्हे तर ‘शिक्षक परिचय’ म्हणून शाळेच्या कार्यालयात लावण्याचे नवे आदेश दिल्याचा निर्णय सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे शिक्षक व प्रशासन संभ्रमात आहेत.

केंद्र सरकारच्या निर्देशानंतर ‘आपले गुरुजी’ या नावाने वर्गात संबंधित शिक्षकांचा फोटो लावावेत, असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. दोन आठवड्यात त्याची पुर्तता करून अहवाल सादर करण्याच्या सूचनाही दिल्या गेल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक वर्गात स्वतः उपस्थित न राहता इतर कोणालाही पाठवतात, अशा प्रकाराला आळा बसावा हा त्यामागील मुख्य हेतू असल्याची चर्चा आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांनी त्यासंबंधीचे आदेश सर्व शाळांना दिले. पण, अद्याप त्याची पुर्तता झालेली नाही. तेवढ्यात आता वर्गात नव्हे तर शाळेच्या कार्यालयात ‘शिक्षक परिचय’ म्हणून वर्गशिक्षकाचे नाव, त्यांचा फोटो लावण्याचे नवे आदेश सरकारने दिल्याचा शासन निर्णय सोशल मिडियावर व्हायरल झाला. त्यामुळे शिक्षण विभागाच संभ्रमात असून त्याची पडताळणी आता उद्या (सोमवारी) केली जाणार आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

नवीन आदेश पाहून कार्यवाही

शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार सर्व शाळांमधील शिक्षकांना त्यांच्या वर्गात स्वत:चा परिचय व फोटो लावणे बंधनकारक केले आहे. पण, आता वर्गाऐवजी शाळेच्या कार्यालयात फोटो लावण्याचे नवे आदेश आल्याचे बोलले जात आहे. त्यासंदर्भात माहिती घेऊन तशी कार्यवाही केली जाईल.

- किरण लोहार, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

सप्टेंबरअखेरीस द्यावा लागणार अहवाल

केंद्राच्या निर्देशानंतर राज्य सरकारने तातडीने निर्णय घेऊन सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून शाळांमधील शिक्षकांना त्यांच्या वर्गात फोटो व थोडक्यात परिचय लावावा, असे आदेश देण्यात आले. २९ ऑगस्ट रोजी अहवाल द्यावा, असे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले होते. पण, अद्याप जिल्ह्यातील एकाही शिक्षकाचे फोटो वर्गात लावलेले नाहीत. त्यामुळे आता ३० सप्टेंबरपर्यंत फोटो लावून त्याचा अहवाल शासनाला सादर करावा लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com