Shivrajyabhishek Symbol : 'त्या' ऐतिहासिक तारखेला दुजाभाव, शिवराज्याभिषेकाचं बोधचिन्ह नव्यानं जाहीर करा - संभाजीराजे

शासनाने परिपत्रक काढून ३५० व्या राज्याभिषेकाचे तयार केले बोधचिन्ह
Shivrajyabhishek Symbol Sambhajiraje
Shivrajyabhishek Symbol Sambhajirajeesakal
Updated on
Summary

शासनाने परिपत्रक काढून ३५० व्या राज्याभिषेकाचे बोधचिन्ह तयार केले आहे. सर्व शासकीय कार्यक्रमात ते वापरण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

कोल्हापूर : ३५० व्या शिवराज्याभिषेक (Shivrajyabhishek Sohala) दिनानिमित्त साकारलेल्या बोधचिन्हात (Shivrajyabhishek Symbol) तत्काळ बदल करून ६ जून तारखेचा ठळक व सन्मानपूर्वक उल्लेख करावा. शिवराज्याभिषेक या ऐतिहासिक घटनेच्या तारखेला शासनाकडून दुजाभाव मिळणे, हे विद्यमान राज्य सरकारच्या प्रतिष्ठेस दूषण लावणारे आहे.

तरी शासनाने सुधारित बोधचिन्ह नव्याने जाहीर करावे, अशी मागणी युवराज संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Shivrajyabhishek Symbol Sambhajiraje
शिवराज्याभिषेक बोधचिन्ह

निवेदनात म्हटले आहे की, यंदा तारखेनुसार ६ जून व तिथीनुसार २ जूनला शिवछत्रपती महाराजांचा ३५० वा राज्याभिषेक दिन साजरा झाला. शासनाकडून तिथीनुसार होणारा दिन शासकीय सोहळा म्हणून साजरा केला होता. तसेच ६ जूनला होणाऱ्या सोहळ्यासही तिथीसाठी उपलब्ध केल्या जाणाऱ्या सर्व सुविधा लागू केल्या जातील, असे बैठकीत ठरले होते.

Shivrajyabhishek Symbol Sambhajiraje
डॉ. आंबेडकर कमान वाद : अॅट्रॉसिटी कशी काय दाखल होऊ शकते? बेडगकरांची बाजू ऐकण्यासाठी समिती स्थापन

शासनाने परिपत्रक काढून ३५० व्या राज्याभिषेकाचे बोधचिन्ह तयार केले आहे. सर्व शासकीय कार्यक्रमात ते वापरण्याचा निर्णय जाहीर केला आहे. बोधचिन्हात श्री शिवछत्रपती महाराजांच्या प्रतिमेसह शिवकालीन राजचिन्हे दर्शवली आहेत. ३५० वे वर्ष दर्शविण्यासाठी स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ३५० चा उल्लेख आहे. मात्र, दिन दर्शविण्यासाठी केवळ ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचा उल्लेख केलेला आहे.

Shivrajyabhishek Symbol Sambhajiraje
दापोली, राजापूरसह 'या' मतदारसंघावर काँग्रेसचा दावा; बड्या नेत्याच्या घोषणेनं 'मविआ'चा फॉर्म्युला बिघडणार?

जागतिक पातळीपर्यंत पोचलेल्या ६ जून तारखेचा उल्लेख केलेला नाही. शासनाने यापूर्वी तिथीनुसार होणारी शिवजयंती तारखेनुसार साजरी करण्यास सुरुवात केली. यासाठी विशेष समिती गठित करून शिवजन्माची तारीख शोधून काढली. असे असताना शिवराज्याभिषेक या ऐतिहासिक घटनेच्या तारखेला शासनाकडून दुजाभाव मिळणे, हे विद्यमान राज्य सरकारच्या प्रतिष्ठेस दूषण लावणारे आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com