दीपक केसरकर म्हणाले, शिवसेनेला ताकद देणारे सरकार महाराष्ट्रात आणणार

Deepak Kesarkar said, a government that gives strength to Shiv Sena will be brought to Maharashtra
Deepak Kesarkar said, a government that gives strength to Shiv Sena will be brought to MaharashtraDeepak Kesarkar said, a government that gives strength to Shiv Sena will be brought to Maharashtra

मुंबई : आम्ही शिवसेनेच्या भल्यासाठी बंड पुकारला आहे. या बंडातून शिवसेनेचेच भलं होणार आहे. महाविकास आघाडीत राहून काही साध्य होणार नाही. सल्ले देणारे अनेक आहेत. आम्ही आमच ऐकतो. या बंडातून शिवसेनेला ताकद देणारे सरकार महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे बंडखोर आमदारांचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले. (Deepak Kesarkar said, a government that gives strength to Shiv Sena will be brought to Maharashtra)

लोक काहीही बोलतात. आम्हाला कोणत्याही पक्षाने पाठिंबा दिलेला नाही. आमच तस बोलनही झालेले नाही. कोणासोबत सरकार स्थापन करायचे याचा निर्णय आमचे नेते एकनाथ शिंदे घेतली. आम्ही त्यांच्यावर सर्वकाही सोपवलं आहे, असेही दीपक केसरकर म्हणाले.

Deepak Kesarkar said, a government that gives strength to Shiv Sena will be brought to Maharashtra
शिवसैनिकाचे वादग्रस्त विधान, बंडखोर आमदारांच्या बायकांबद्दल म्हणाले...

आमच्यासोबत शिवसेनेच्या (Shiv Sena) चिन्हावर लढलेले एकूण ४० आमदार आहेत. तसेच अपक्ष १२ आमदार आहे. यामुळे ते गटनेतेपदावरून एकनाथ शिंदे यांना हाकलू शकत नाही. आम्ही शिवसैनिक आहोत. शिवसेनेच्या चिन्हावरच निवडून आलो आहोत. संजय राऊत खालच्या पातळीवर बोलतात. हे बरोबर नाही, असेही दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांनी आम्हाला पक्षातील घाण म्हटले. आम्ही घाण आहोत का? कालपर्यंत तुम्ही आमच्यासोबत एकाच गाडीत बसून फिरत होता. आज आम्ही तुम्हाला घाण वाटतो का? आम्हाला नागरिकांनी निवडून दिले म्हणून तुम्ही सत्तेत आला हे लक्षात ठेवा. इतक्या खालच्या पातळीवर बोलण्याची गरज नाही, असेही केसरकर म्हणाले.

Deepak Kesarkar said, a government that gives strength to Shiv Sena will be brought to Maharashtra
उज्ज्वल निकम यांचे महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य; म्हणाले...

आमच्याबद्दल वाटेल ते अपशब्द वापरले जात आहे. आम्हाला, आमच्या कुटुंबाबद्दल काहीही बोलत आहात. बायका व मुलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करीत आहेत, हे बरोबर नाही. ही बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण नाही. इतक्या खालच्या पातळीवर बोलण्याची गरज नाही, असेही दीपक केसरकर म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com