दिपक मानकरचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर 

Deepak Mankar
Deepak Mankar

मुंबई : पुण्यातील इस्टेटब्रोकर जितेंद्र जगताप आत्महत्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दिपक मानकर यांना अटकेपासून संरक्षण देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना सुसाईड नोटमध्ये मानकरी यांचे नाव असल्याचा उल्लेख असल्याचे न्या. मृदुला भाटकर यांनी मान्य केले. 

मानकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयातील विविध न्यायमूर्तींनी यापूर्वी  नकार दिला होता. जितेंद्र जगताप हे अनेक वर्ष दिपक मानकर यांच्याकडे काम करायचे. 2 जून रोजी रेल्वे खाली उडी घेऊन आत्महत्या करण्यापूर्वी जगताप यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत पाच जणांच्या नावाचा उल्लेख करत त्यांना आपल्या मृत्यूसाठी जबाबदार धरले होते.

या पाच जणांत दिपक मानकर यांच्याही नावाचा समावेश आहे. या प्रकरणात पोलिसांनी अटकसत्र सुरू करताच मानकर यांनी हायकोर्टात अटकपूर्व केला होता. जगताप यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये दिपक मानकर, बिल्डर सुधीर कर्नाटकी, विनोद भोळे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे.

रास्ता पेठेतील एका जागेच्या वादातून हा प्रकार घडला. जितेंद्र जगताप हा गेली अनेक वर्ष दिपक मानकरांचे जमिनीचे व्यवहार पाहात होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून समर्थ पोलिस स्टेशनसमोर असलेल्या जागेवरुन दोघांमध्ये वाद सुरु होता. त्यासाठी मानकर, कर्नाटकी, भोळे यांच्या अनेकवेळा बैठकाही झाल्या होत्या. जागेचा ताबा सोडण्यासाठी मानकर जितेंद्र जगतापवर दबाव टाकत होते.

दरम्यान जितेंद्र जगताप हा खंडणी उकळण्यासाठी आत्महत्येची धमकी देत होता आणि त्याबद्दलचा अर्ज 1 जूनलाच पोलिस आयुक्तालयात दिल्याचे म्हटले होते, पण न्यायालयाने ही बाब अमान्य केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com