नरेंद्र मोदींची बदनामी मान्य नाही - शिवसेना

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 डिसेंबर 2016

मुंबई : कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या आरोपाच्या पार्श्‍वभूमीवर शिवेसेनेने "सामना'तील अग्रलेखाद्वारे पंतप्रधान मोदी यांची बदनामी मान्य करणार नसल्याचे स्पष्ट करत केले आहे.

मुंबई : कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या आरोपाच्या पार्श्‍वभूमीवर शिवेसेनेने "सामना'तील अग्रलेखाद्वारे पंतप्रधान मोदी यांची बदनामी मान्य करणार नसल्याचे स्पष्ट करत केले आहे.

राहुल गांधी यांनी केलेली टीका फारशी तीव्र नाही मात्र त्याची भाजप सरकारला दखल घ्यावी लागली असे अग्रलेखात म्हटले आहे. 'मोदी हे प्रामाणिक आहेत व त्यांच्यावर फालतू आरोप होऊ नयेत असे त्यांच्या राजकीय परिवारास वाटत असेल तर त्यात चुकीचे काहीच नाही. आम्हालाही मोदी यांच्या प्रतिमेची चिंता आहे आणि म्हणूनच आम्ही हे सांगत आहोत. मनमोहन सिंग हे आतापर्यंतचे सगळ्यात सचोटीचे पंतप्रधान होते. नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी यांच्या सचोटीवरही शंका घेता येणार नाही, पण त्यांनाही आरोपांच्या अग्निदिव्यातून जावेच लागले. इतरही अनेकांवर आरोपांची राळ उडाली. अगदी हिंदुस्थानी राजकारणातील भीष्म पितामह म्हटले जाणारे लालकृष्ण अडवाणी यांच्यावरही 'जैन डायरी'प्रकरणी असेच भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. हवाला प्रकरणातील आरोपी जैन यांच्या डायरीतील नोंदींवरून हे आरोप करण्यात आले होते', असे अग्रलेखात पुढे म्हटले आहे.

मात्र, "भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या व्यक्तींची डायरीतील नावे आणि इतर उल्लेख हे पुरावे कसे होऊ शकतात?' असा प्रश्‍नही उपस्थित करत या नोंदी अविश्‍वासार्ह असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे. राहुल गांधी यांच्या आरोपांवर मोदी यांनी दिलेल्या उत्तराचा अग्रलेखात उल्लेख करण्यात आला आहे. "पंतप्रधान मोदी यांची ही बदनामी आम्हास मान्य नाही. मुंबई महापालिकेत माफियांचे राज्य सुरू आहे व तिथे भ्रष्टाचाऱ्यांचा अड्डा आहे असे बोलणाऱ्यांना चिरंजीव राहुल या कच्च्या लिंबूने आव्हान दिले आहे. गंगेच्या शुद्धीकरणासाठी सगळ्यांनाच "करसेवा' करावी लागेल', असे अग्रलेखात म्हटले आहे.

Web Title: Defamation of Narendra Modi no accepted : Shivsena