'४८ तासात माफी मागावी'; सोमय्यांकडून संजय राऊतांना मानहानीची नोटीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

defamation notice to sanjay raut for allegations over medha kirit somaiya in toilet scam

'४८ तासात माफी मागावी'; सोमय्यांकडून संजय राऊतांना मानहानीची नोटीस

मागील काही दिवसांपासून शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दरम्यान संजय राऊत (Sanjay Raut) यांनी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर १०० कोटींचा टॉयलेट घोटाळा केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणात संजय राऊत यांनी माफी मागावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

या प्रकरणात संजय राऊतांना मानहानीची नोटीस पाठवली असून त्यांना माफी मागण्यासाठी ४८ तासांची मुदत देखील दिली आहे. संजय राऊत यांना मेधा सोमय्या यांनी मानहानीची नोटीस पठवली आहे. या सोबतच किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांनी ४८ तासात माफी मागावी, असे म्हटले आहे. सोमय्या यांनी ट्विट केलं आहे की, 'शिवसेना नेते संजय राऊत यांनी ४८ तासात माफी मागावी, मेधा किरीट सोमैया यांची संजय राउत यांना बदनामीची defamation नोटीस' या सोबतच त्यांनी या नोटीसीचा फोटो देखील जोडला आहे.

हेही वाचा: चीनी स्मार्टफोन कंपनी Xiaomi ला ईडीचा दणका; जप्त केले 5,551 कोटी

मिरा भाईंदर महापालिकेसह राज्यातील इतर भागात १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त घोटाळा झाला आहे. यामध्ये किरीट सोमय्यांचा सहभाग आहे, असे आरोप संजय राऊतांनी केले होते. मागचे २० दिवस झाले एकही कागद न देता आरोप करत आहेत. याबाबत संजय राऊतांनी माफी मागावी अशी मागणी सोमय्यांनी केली आहे. तसेच IPC ५००, ५०१ आणि ५०६ कलमांतर्गत राऊतांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

हेही वाचा: 'द्वेशाचं राजकारण' प्रकरणी माजी न्यायमूर्तींकडून PM मोंदीची पाठराखण

काय आहे शौचालय घोटाळा?

मिरा-भाईंदर शहरात एकूण १५४ सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. त्यातील १६ शौचालये बांधण्याचे कंत्राट किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांना मिळालं. त्यांचं युवक प्रतिष्ठान आहे. यामार्फत हे कंत्राट मार्गी लावण्यात आलं. मात्र, बनावट कागदपत्रे सादर करून, पालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

साडे तीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिलेही घेतल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. त्याची दखल घेत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी करून, अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले.

हेही वाचा: Infinix Smart 6 भारतात लॉन्च, पाहा किंमत-फीचर्स

Web Title: Defamation Notice To Sanjay Raut For Allegations Over Medha Kirit Somaiya In Toilet Scam

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top