महाराष्ट्राला डेल्टापासून धोका कायम, AY.4 ची रुग्णसंख्या जास्त

एप्रिल महिन्यात महाराष्ट्रात चाचणी करण्यात आलेल्या १ टक्के नमुन्यांमध्ये AY.4 व्हेरिएंट आढळला होता.
Delta plus virus
Delta plus virussakal media

मुंबई: कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटपैकी (Corona variant) डेल्टा (delta) व्हेरिएंटपासून धोका कायम आहे. महाराष्ट्रात आणि भारतात डेल्टा व्हेरिएंटबाधितांची संख्या जास्त आहे. आता याच डेल्टाच्या घराण्यातील AY.4 या नव्या उप व्हेरिएंटने बाधित होणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. AY.4 मुळे चिंताजनक (concern) स्थिती आहे, असं आताच म्हणणं खूपचं घाईचं ठरेल, असं शास्त्रज्ञांच मत आहे.

एप्रिल महिन्यात महाराष्ट्रात चाचणी करण्यात आलेल्या १ टक्के नमुन्यांमध्ये AY.4 व्हेरिएंट आढळला होता. जुलै महिन्यात या व्हेरिएंटचे वाढीचे प्रमाण २ टक्के तर ऑगस्टमध्ये ४४ टक्के आहे. ऑगस्ट महिन्यातील नमुन्यांचे बारकाईने निरीक्षण केले, तर असे आढळून येईल की, १११ नमुन्यामध्ये डेल्टा (B.1617.2) आढळला. एकूण ३०८ नमुन्यांचे विश्लेषण करण्यात आले. हे प्रमाण ३६ टक्के आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

Delta plus virus
संगमनेर : बसचालकाची आत्महत्या; एसटी विभागाला झटका

AY.4 १३७ नमुन्यांमध्ये आढळला. हे प्रमाण ४४ टक्के आहे. संपूर्ण देशभराचा विचार केला, तर जून महिन्यात सर्व नमुन्यांच्या चाचणीमध्ये AY.4 चे प्रमाण ५ टक्के होते. जुलैमध्ये ते वाढून ८ टक्के झाले. ऑगस्ट महिन्यात हेच प्रमाण ४५ टक्के होते. डेल्टा व्हेरिएंटमुळे कोविडच्या लक्षणांमध्ये किती बदल झालाय, त्यामुळे एखादा रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण किती आहे, त्याचा अभ्यास महापालिकेकडून केला जातोय. AY.4 चा जागतिक स्तरावर अभ्यास सुरु आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com