'महाबीज'मार्फत 20 लाखांच्या लाभांशाचा धनादेश

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 जानेवारी 2017

मुंबई - महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) राज्यातील शेतकरी बांधवांना योग्य दरामध्ये गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध करून देण्याचे कार्य करीत आहे. यंदा ही संस्था नफ्यामध्ये असून, 2015-16 या वर्षासाठी 20 लाख 50 हजार रुपये लाभांशाचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, कृषी विभागाचे प्रधान सचिव तथा "महाबीज'चे अध्यक्ष विजय कुमार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे अधिकारी संजय ठकरार, महाव्यवस्थापक (वित्त), विनय वर्मा, कंपनी सचिव उपस्थित होते.
Web Title: demand draft by mahabeej