एसटी कामगारांच्या प्रश्‍नावर आज तोडगा 

एसटी कामगारांच्या प्रश्‍नावर आज तोडगा 

सोलापूर - राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिला जाणारा "फेस्टिव्हल ऍडव्हान्स' राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना द्यावा, या मागणीवरून एसटी कामगार 25 ऑक्‍टोबरला निदर्शने करणार आहेत. ऐन दिवाळीत कर्मचाऱ्यांना दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्यानुसार, बुधवारी (ता.23) राज्य परिवहन महामंडळ प्रशासन व कर्मचाऱ्यांची बैठक ठरली आहे.

सुधारित वेतनश्रेणीचा कमाल टप्पा विचारात घेऊन कर्मचाऱ्यांना 12 हजार 500 रुपये द्यावेत. तसेच कामगार कराराच्या तरतुदीनुसार जुलै 2019 पासून तीन टक्‍के वाढीव महागाई भत्ता थकबाकीसह दिवाळीपूर्वी मिळावा, अशी मागणी कामगार संघटनांनी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com