shugar
shugar Thorat factory grinds 12 lakh tonnes

गोड बातमी ः ब्राझीलमध्ये दुष्काळ, भारताची चांदी

शिर्डी ः दुष्काळ तिकडे ब्राझीलमध्ये अन् ‘फिल गुड’ भारतातील साखर उद्योगात, असे चित्र सध्या पाहायला मिळतेय. प्रमुख साखरउत्पादक देश असलेल्या ब्राझीलमध्ये ९१ वर्षांनंतर पहिल्यांदा दुष्काळ पडल्याने, यंदा जागतिक बाजारपेठेत साखरेचा तुटवडा निर्माण झाला. तो भरून काढण्यासाठी नगर जिल्ह्यासह देशातील बऱ्याच कारखान्यांची गोदामे उघडण्यात आली. व्यापारी गोदामांतून २९ रुपये प्रतिकिलो दराने निर्यातीसाठी साखर खरेदी करीत आहेत.

दुष्काळामुळे ब्राझीलमधील साखरउत्पादन ४० लाख मेट्रिक टनांनी कमी झाले. थायलंडचे साखरउत्पादनही घटले. जागतिक पातळीवर साखरेचा तुटवडा निर्माण झाला आहे.

त्याच वेळी भारतात लॉकडाउन असल्याने शीतपेये, मिठाई आदींसाठी लागणाऱ्या साखरेचा खप घटला. त्यातच कारखान्यांच्या गोदामांत यंदा तब्बल 140 लाख मेट्रिक टन साखरसाठा शिल्लक राहिला. पुढच्या वर्षीचे उत्पादन गृहीत धरले, तर साखर ठेवायची कुठे, अशी समस्या निर्माण झाली होती. (Demand for sugar in India due to drought in Brazil)

shugar
शेजाऱ्याने शेतरस्ता अडवला असेल तर साधा अर्ज करील काम तमाम

केंद्राने साखरेचे किमान विक्रीमूल्य प्रतिकिलो ३१ रुपये निश्‍चित केले. मात्र, देशात साखरेला उठाव नाही. गोदामातील साखरेच्या पोत्याला रोज एक रुपया व्याजाचा भार सोसावा लागतो. पोत्यामागे अडीचशे रुपये व्याजाचा भुर्दंड सोसण्याऐवजी कारखाने पोत्यामागे दोनशे रुपये कमी घेऊन निर्यातदार व्यापाऱ्यांना ‘ओपन जनरल लायसन्स’च्या आधारे साखर विकणे पसंत करीत आहेत.

ब्राझील व थायलंडचे घटलेले साखरउत्पादन भारताच्या पथ्यावर पडले. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेचे दर वाढले आहेत. त्यामुळे भारत यंदा जवळपास ७५ लाख मेट्रिक टन साखर निर्यात करू शकेल. ब्राझीलचा दुष्काळ आपल्या साखरउद्योगाला वरदान ठरलाय.

- बी. डी. औताडे, निवृत्त कार्यकारी संचालक, गणेश साखर कारखाना

(Demand for sugar in India due to drought in Brazil)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com