Pune Crime : पुण्यात सहा येमेनी नागरिकांवर मोठी कारवाई; पोलिसांनी मोठ्या शिताफीने... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Crime

Pune Crime : पुण्यात सहा येमेनी नागरिकांवर मोठी कारवाई; पोलिसांनी मोठ्या शिताफीने...

पुणेः अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या येमेन देशाच्या सहा नागरिकांवर डिपोर्टेशनची कारवाई करण्यात आलेली आहे. पुणे पोलिसांच्या विशेष शाखेच्या प्रॉसिक्युशन ॲन्ड व्हिजिलन्स सेलकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

यात दोन पुरुष अल्खराज अतेक (३७), श्र्वाकी खररज (३४) यासह महिला हेबा हुसेन व तीन अल्पवयीन मुलांचा समावेश होता. सदरील सहा जण पुण्यातील कोंढवा परिसरात वास्तव्यास होते. पासपोर्ट व व्हिसाशिवाय अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या येमेन देशाच्या या सहा नागरिकांना परकीय नागरिक नोंदणी शाखेच्या पथकाने ऑक्टोबर महिन्यात ताब्यात घेतले.

हेही वाचाः जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व नागरिक विद्यार्थी व्हिसावर भारतात आले होते आणि सन २०१७ पासून भारतात अवैधरित्या वास्तव्य करत होते. सदर नागरिकांना एफ.आर. ओ. कार्यालयाने ताब्यात घेतल्यानंतर दोन पुरुषांना कोंढवा पोलिस स्टेशन हद्दीत देखरेखीखाली ठेवण्यात आले. तर महिलेला तिच्या तीन अल्पवयीन मुलांसोबत पुणे हडपसर रेस्क्यू फाऊंडेशन, येथे देखरेखीखाली ठेवण्यात आले होते.

या सर्व जणांचे नवीन पासपोर्ट मुंबईस्थित येमेनदेशाचे दुतावासाकडून प्राप्त करुन घेण्यात आले. येमेन परकीय नागरिकांना त्यांचे मूळ देशात पाठविण्यात येणार होते. परंतू सदरील नागरिकांचा डिपोर्टेशन व येमेन येथे जाण्यास विरोध होता.

हेही वाचा: Year Ender 2022 : श्रद्धाचे 35 तुकडे ते भट्टीत बापाला जाळले... 'या' 7 घटनांनी देश हादरला

मुंबईस्थित येमेन दुतावासाचे मदतीने त्यांचे विमान तिकीट आरक्षित करण्यात आले. येमेन येथे जाण्यास सदर नागरिकांचा विरोध असल्याने मोठ्या शिफातीने येमेनी नागरिकांना अखेर मुंबई विमानतळ येथे नेवून हद्दपारीची कारवाई करण्यात आली.

टॅग्स :Pune Newspolice