... तर सार्वजनिक वाहतूक बंद करणार : उपमुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 March 2020

हातावर पोट असणाऱ्या कामगारांना विनावेतन सुटी दिल्यास त्यांचे हाल होतील. त्यामुळे उद्योग, आस्थापनांच्या मालकांनी सुटीच्या दिवशीचे कामगारांना वेतन द्यावे. रेशन दुकानांवर नागरिकांना तीन महिन्यांचे धान्य देण्यात येईल.

पुणे : कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारकडे पुरेसा निधी असून, निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.२०) पत्रकार परिषदेत दिली. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पवार म्हणाले, राज्यात कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पुढील टप्पे खूप महत्त्वाचे आहेत. पुढील 15 दिवस महत्त्चाचे असून, नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याची खबरदारी घ्यावी. पंतप्रधानांच्या आवाहनानुसार "जनता कर्फ्यू'ची राज्यात अंमलबजावणी करण्यात येणार असून, नागरिकांनी सहकार्य करावे. स्वच्छता कामगार, पाणीपुरवठा, वीजपुरवठा यासह अत्यावश्‍यक सेवेसाठी कर्मचारी येतील. नागरिकांनी प्रवास टाळावा. अन्यथा गर्दी केल्यास सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्यात येईल. 

- Coronavirus : आता 36 देशांतील नागरिकांना भारतात बंदी!

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्याला सहकार्य मिळत आहे. पंतप्रधान आणि केंद्रीय आरोग्य मंत्री राज्याच्या संपर्कात आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. घरात थांबूनच कामे करावीत. घाबरून जाण्याचे कारण नाही. सर्वांनी मिळून या संकटाशी लढा देऊ या. जे लोक अजूनही खबरदारी घेत नाहीत, त्यांनी घरीच राहून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. 

- Coronavirus: रेल्वेची 18 दिवसांत अडीच लाख तिकिटे रद्द ! 

हातावर पोट असणाऱ्या कामगारांना विनावेतन सुटी दिल्यास त्यांचे हाल होतील. त्यामुळे उद्योग, आस्थापनांच्या मालकांनी सुटीच्या दिवशीचे कामगारांना वेतन द्यावे. रेशन दुकानांवर नागरिकांना तीन महिन्यांचे धान्य देण्यात येईल. ग्रामीण भागातील नागरिकांनीही खबरदारी घ्यावी. जिल्हा परिषदेकडून ग्रामीण रुग्णालयांमध्येही उपचारासाठी व्यवस्था करण्यात आली आहे, असे पवार यांनी सांगितले. 

- वाईन शॉप, देशी दारूची दुकाने 31 मार्चपर्यंत बंद

संशयित रुग्णांवर बहिष्कार नको : पवार 

परदेशातून आलेल्या सर्वांवरच संशयाने बघू नका. कोरोनाबाधित किंवा संशयित रुग्ण बरा होऊन घरी परतल्यानंतर त्यांच्यावर कोणी बहिष्कार टाकू नका. सर्वजण आपल्या कुटुंबातील आहेत, असे समजून वागा, असे आवाहन पवार यांनी केले. 

उपमुख्यमंत्री पवार काय म्हणाले?

- नागरिकांनी लग्न समारंभ, अंत्यविधीच्या ठिकाणी गर्दी टाळावी.
- किराणा माल, भाजीपाला, चिकनची दुकाने उघडी ठेवा.
- होमगार्डसची संख्या वाढविण्यात येणार 
- खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' ची सवलत द्यावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy CM Ajit Pawar made a statement about Public Transport will be stopped due to Coronavirus