सोलापूरच्या विकासासाठी स्पेनचे सहकार्य 

विजयकुमार सोनवणे
सोमवार, 21 मे 2018

सोलापूर : शाश्‍वत शहरी विकास योजनेंतर्गत सोलापूर महापालिका आणि स्पेनमधील मुर्शिया या शहरादरम्यान गुरुवारी (ता.24) सामंजस्य करार होणार आहे. त्यासाठी स्पेनचे शिष्टमंडळ सोलापुरात येणार आहे. महापालिकेच्या वतीने महापौर व आयुक्त या कराराव स्वाक्षरी करतील. 

सोलापूर : शाश्‍वत शहरी विकास योजनेंतर्गत सोलापूर महापालिका आणि स्पेनमधील मुर्शिया या शहरादरम्यान गुरुवारी (ता.24) सामंजस्य करार होणार आहे. त्यासाठी स्पेनचे शिष्टमंडळ सोलापुरात येणार आहे. महापालिकेच्या वतीने महापौर व आयुक्त या कराराव स्वाक्षरी करतील. 

युुरोपियन युनियनने आशिया आणि उत्तर-दक्षिण अमेरिकातील शहर आणि भागीदार शहरातील शाश्‍वत शहरी विकासावर सहकार्य वाढविण्यासाठी आंतरराष्ट्रीय शहरी सहकारिता कार्यक्रम विकसित केला आहे. या करारांतर्गत स्थानिक नेत्यांना विकास समस्यांना हाताळण्यावर नवीन दृष्टीकोन ठेवून संपर्क साधता येणार आहे. आंतरराष्ट्री शहरी सहकार्य कार्यक्रमांतर्गत शहरांच्या जोडीला पुढाकार घेण्यासाठी मलेशियातील क्वालालांपूरमधील फोरममध्ये सुरवात करण्यात आली आहे. त्याचे समर्थन करण्यासाठी भारत कार्यक्रम महापालिका यांच्यात भागीदारी करार होणार आहे. 

एक करार झाल्यावर भारतातील बारा शहरे युरोपियन युनियनमधील 12 शहरांशी जोडण्याची प्रक्रिया सुरु होईल. जी शहरे स्थानिक कृती आराखडाच्या (लोकल ऍक्‍शन प्लॅन) विकासासाठी समान शहरीकरण आव्हानांचा सामना करण्यासाठी सहकार्य करेल. ही योजना दोन वर्षांपर्यंत सुरु राहणार आहे. शहराच्या विकासासाठी तांत्रिक व सहाय्यभूत आधार आदान-प्रदान केले जाणार आहेत. अभ्यास दौरा, ज्यामध्ये पाच राजकीय आणि तांत्रिक प्रतिनिधींचा समावेश असणार आहे. महापालिका कर्मचाऱ्यांच्या विशिष्ट गरजा, विनंती आणि ओळखीसाठी सेवांची देवाणघेवाण केली जाईल. 

या आव्हानांसाठी होईल सामंजस्य करार 
- हवा, पाणी, ध्वनी प्रदुषण, सांडपाणी, उर्जा व्यवस्थापन आणि कार्यक्षमता. 
- ऐतहासिक वारसा क्षेत्र, मनोरंजनासाठी तसेच संवर्धनासाठी हिरव्या, पर्यावरणीय भागाचा विकास 
- टिकाऊ गृहनिर्माण, पायाभूत सुविधांसाठी खासगी-सार्वजनिक भागिदारी 
- शैक्षणिक क्षेत्रातील आव्हानांचा सामना करण्यासाठी उपाययोजना 

Web Title: for development of solapur help of Spain