जगात सुरत, नागपूरचा विकास सुसाट...

जगात सुरत, नागपूरचा विकास सुसाट...

नाशिक - आर्थिक वाढीसाठीच्या जगातील दहा शहरांचा विचार करता, पुढील दोन दशकांत भारत वर्चस्व गाजवेल, असे ऑक्‍सफर्ड इकॉनॉमिक्‍सने स्पष्ट केले आहे. हिऱ्यांना पैलू पाडणारे आणि व्यापार केंद्र सुरत २०३५ पर्यंत सर्वांत वेगाने विस्तारित होईल, त्याची सरासरी नऊ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असेल, असे ऑक्‍सफर्डचे जागतिक शहरे संशोधन विभागप्रमुख रिचर्ड होल्ट यांनी अहवालात म्हटले आहे. याच कालावधीत महाराष्ट्राची उपराजधनी नागपूर पाचव्या स्थानी असेल.

शहरी घडामोडींवर जागतिक विचार-संहिता असलेल्या सिटी मेयर्स फाउंडेशनच्या नोव्हेंबर २०११ मधील सर्वेक्षणानुसार जगातील ३०० सर्वांत वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये ३७ शहरे भारतातील होती. त्यामध्ये चीनमधील बेहिई हे जगातील सर्वांत वेगाने वाढणारे शहर म्हणून नमूद करण्यात आले होते. या शहराच्या लोकसंख्यावाढीचा दर १०.५८ टक्के होता. येमेनमधील साना हे पाच टक्के लोकसंख्यावाढीसह जगातील तिसरे शहर होते. त्या वेळी सुरत ४.९९ टक्के वार्षिक लोकसंख्यावाढीच्या दरासह जगात चौथ्या स्थानावर होते. ‘वाइन कॅपिटल ऑफ इंडिया’ नाशिक सोळाव्या, तर नागपूर ११४ व्या स्थानावर होते. देशामध्ये गाझियाबाद, सुरत, फरिदाबाद, नाशिक, पाटणा, राजकोट अशा जलदगतीने वाढणाऱ्या शहरांची क्रमवारी होती. नाशिकचा वार्षिक सरासरी वाढीचा दर ३.९० टक्के, तर नागपूरचा २.२६ टक्के होता. देशातील तिसऱ्या स्थानावरील फरिदाबाद त्या वेळी जगात आठव्या स्थानावर होते. 

घरेलू उत्पादन अधिक
भारतातील ‘टॉप टेन’मधील बऱ्याच शहरांमधील आर्थिक उत्पादन हे जगातील सर्वांत मोठ्या महानगरांच्या तुलनेत कमी असेल. तसेच, सर्व आशियाई शहरांचे एकत्रित सकल घरेलू उत्पादन २०२७ मध्ये एकत्रित केलेल्या सर्व उत्तर अमेरिकन आणि युरोपियन शहरांपेक्षा अधिक असेल. २०३५ पर्यंत ते १७ टक्के होईल. चीनमधील शहरांमधील त्यात अधिक वाटा असेल. त्याचप्रमाणे ऑक्‍सफर्ड इकॉनॉमिक्‍सच्या म्हणण्यानुसार २०३५ पर्यंत जगातील सर्वांत मोठ्या शहरांच्या स्थानांमध्ये बदल होईल.    

ऑक्‍सफर्ड इकॉनॉमिक्‍सचा आर्थिक अंदाज
 २०१९ मध्ये जागतिक जीडीपी वाढ ३.१ वरून २.८ आणि २०२० मध्ये २.७ पर्यंत कमी होईल.
अलीकडे इक्विटी विक्रमी आर्थिक बाजारातील जोखीम अधोरेखित करतात; पण मोठ्या प्रमाणात बाजारात घट अपेक्षित नाही.
अमेरिकेच्या २०१९ मधील २.५ टक्के वाढीस समर्थन आहे. आर्थिक धोरणाचे प्रोत्साहन हे त्याचे कारण.
मोठ्या प्रमाणात तेलाचे दर स्थिर, महागाई कमी करणे, नोकऱ्यांमधील लवचिकता या बाबी बाजाराच्या पुढील वर्षीच्या दृष्टिकोनाचे समर्थन करतात.

देशातील दहा शहरे
जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये भारत आघाडीवर राहणार आहे. जगातील पहिली भारतातील दहा शहरे पुढीलप्रमाणे ः (कंसात वार्षिक सरासरी वृद्धीची टक्केवारी) 
सुरत     (९.१७) 
आग्रा     (८.५८) 
बंगळूर     (८.५) 
हैदराबाद     (८.४७) 
नागपूर     (८.४१) 
तिरुप्पूर     (८.३८) 
राजकोट     (८.३३) 
तिरुचिरापल्ली     (८.२९) 
चेन्नई     (८.१७) 
विजयवाडा     (८.१६)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com